spot_img
spot_img

खडांबे विद्यालयाच्या कबड्डी संघाची जिल्हास्तरावर निवड

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):–  अहमदनगर क्रीडा युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे तसेच अहमदनगर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व राहुरी तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बाळासाहेब वाणी इंग्लिश स्कूल, गणेगाव ता. राहुरी येथे १४ ते १९ वर्ष वयोगटातील मुलांच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या. 

१७ वर्ष वयोगटातील मुलांचा अंतिम सामना श्री शाहू विद्या मंदीर खडांबे व सावित्रीबाई फुले विद्यालय कृषी विद्यापीठ यांच्यामध्ये झाला. यामधे खडांबे विद्यालयाने सहा गुणांनी बाजी मारली. या संघात संघनायक सत्यजित पवार, अविष्कार उगले, जयदीप कल्हापूरे, साई हरिश्चंद्रे, दुर्गेश उगले, कृष्णा पटारे, साईराज कल्हापूरे, आकाश मारकड, आदित्य कल्हापूरे, विश्वजीत पवार, वैभव गाडेकर, चैतन्य उगले, शुभम हरिश्चंद्रे, सोहम कल्हापूरे यांनी नेत्रदीपक खेळ करीत विजय मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला. तालुक्यातील एकूण तीस संघानी यात सहभाग घेतला होता. या खेळाडूंना क्रीडाशिक्षक आप्पासाहेब शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाचे विद्यालयाचे मुख्याध्यापक जयसिंग नरवडे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर सेवक ,विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!