मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):- बॉलिवूडचे सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी पहाटे आत्महत्या केली. मुंबईजवळील कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये पहाटे ३.३० च्या सुमारास त्यांनी गळफास लावून घेतला. त्यांच्यावर आज म्हणजेच शुक्रवारी दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नितीन यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही जेजे रुग्णालयात पोहोचले होते. यानंतर नितीन यांचे पार्थिव जेजे हॉस्पिटलमधून एनडी स्टुडिओमध्ये आणण्यात आले आहे.त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी एनडी स्टुडिओमध्ये ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देसाई यांच्या फोनमधून जप्त करण्यात आलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये कर्ज कंपनी आणि मानसिक छळ केल्याचा उल्लेख आहे. पोलिस या कंपनीचे सीईओ आणि अधिकाऱ्यांची चौकशी करणार आहेत. देसाई आत्महत्या प्रकरणातील क्लिपची चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे सांगण्यात आले आहे. दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ज्या ऑडिओ क्लिप मध्ये बऱ्याच गोष्टीची उल्लेख केला गेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अनेक मोठे घडामोडी घडतील असे वाटत आहे.