वैजापूर( जनता आवाज वृत्तसेवा ):-नांदूर मधमेश्वर कालवा कार्यालयात झालेल्या बैठकीत तक्रारीचा पाऊस पडला.पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी बुधवारी नांदुर मधमेश्वर कालवा कार्यालय परिसरात पाणी वापर संस्था पदाधिकाऱ्यांची बैठक कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.शासनाने पाणी वापर संस्था सक्षमीकरणासाठी पदाधिकारी यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी युवा मित्र संस्थेची नेमणूक केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
नांदूर मधमेश्वर कालवा कार्यालयात पाणी वापर संदर्भात झालेल्या बैठकीत तक्रारीचा पडला पाऊस
या बैठकीस वैजापूर सह गंगापूर, कोपरगाव तालुक्यातील पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत पदाधिकारी यांनी तक्रारी व समस्या मांडल्या.यात अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या.नांदुर मधमेश्वर कालवा विभागाने वितरीकेसाठी संपादीत केलेल्या जमीनीवर गंगापूर तालुक्यात चक्क प्लाॅट पाडले असल्याचे एका पदाधिकाऱ्याने
सांगितले.भुसंपादनचे पैसे मिळाले नाही.शेतात पाणी येत नाही.वितरीकेला टेल काढले नाही.वितरीकेवर पाणी सोडण्यासाठी गेट नाही. २००९ पासून पाणी वापर संस्था स्थापन झाल्या.मात्र त्यांच्या निवडणूका नाही.तसेच लेखापरीक्षण देखील नाही. संस्थांचा निधी अद्याप मिळाला नाही.पाणी वापर संस्थांना वसुलीचे अधिकार देण्यास नांदूर मधमेश्वर कालवा विभागाचे अधिकारी तयार नाहीत.दोन तीन वर्षांपासून पाणी मिळाले नाही. अशा विविध गंभीर स्वरुपाच्या तक्रारी यावेळी पदाधिकारी यांनी मांडल्या.यावेळी कार्यकारी अभियंता गुजरे म्हणाले मागे काय गैरव्यवहार झाला.त्यावर मी कारवाई करू शकत नाही.केंद्र व राज्य शासन कालव्याच्या कामासाठी निधी देते.या कालव्याच्या कामासाठी शासनाने यापूर्वी निधी दिला असुन देखील दुसऱ्यांदा यावर निधी खर्च करावा लागत आहे.असे गुजरे यांनी सांगितले.नवीन निधी खर्च झाल्यानंतर तक्रारी येणार नाही.याची जबाबदारी पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी यांचेवर राहील.असे त्यांनी सांगितले.
गैरव्यवहारा बाबत तक्रारी करु नका.मला कारवाईचे अधिकार नाहीत.असे त्यांनी सांगितले.एका पदाधिकाऱ्याने गैरव्यवहाराबाबत बोलण्याचा प्रयत्न केला असता,गुजरे यांनी त्यांना बैठकीतून उठून जाण्याचे फर्मान सोडल्याने पदाधिकारी चांगलेच अचंबित झाले.युवा मित्र संघटनेचे कार्यक्रम अधिकारी अतुल सुरवसे यांनी गावागावात पाणी वापर संस्थांचे सक्षमीकरण करण्यासाठी बैठका घेणार असल्याचे सांगितले.या बैठकीस भाऊसाहेब वाकचौरे,संजय जामदार, पंडीत शिंदे,छगन सावंत, नानासाहेब गायकवाड,युवा मित्र संस्थेचे कार्यक्रम अधिकारी चेतन वाघुळदे आदीसह नांदुर मधमेश्वर कालवा विभागाचे अधिकारी व पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.