spot_img
spot_img

गद्दार म्हणणाऱ्यांनीच खरी गद्दारी केली आणि राज्याचा विकास खुंटविला – खा.डॉ.सुजय विखे पाटील

पाथर्डी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ह्या भाजप आणि शिवसेना यांनी युतीत लढल्या मात्र मुख्यमंत्र्याची खुर्ची मिळावी म्हणून ठाकरेंनी गद्दारी केली आणि राज्यात सत्तेत आले, या सत्तेच्या काळात घरात बसून कारभार केला आणि राज्याला विकासा पासून कोसो मैल दूर नेण्याचे पाप केल्याचा आरोप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी केला. 

पाथर्डी येथे निःशुल्क सहायक उपकरण वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ.मोनिका ताई राजळे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर महिला तालुकाध्यक्ष श्रीमती काशीबाई गोल्हर, माजी नगराध्यक्ष अभयकाका आव्हाड, माजी जि.प.सदस्य राहुल राजळे श्री प्रतीक खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खा.विखे म्हणाले की आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी आ. मोनिका ताई राजळे आणि मी खूप मेहनत घेतली त्यामुळेच या परिसरातील रस्ते महामार्ग, तीर्थ क्षेत्र विकास योजेअंतर्गत देवस्थानचा विकास, या सारख्या मोठमोठ्या योजना होहू शकल्या असून या मतदार संघातील जेष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजने अंतर्गत आज सहायक उपकरण वाटप करत आहोत. या सहायक उपकरणाची प्रती माणसी जवळपास दहा हजार रुपये किंमत आहे आणि हे आपण या नागरिकांना निःशुल्क देत आहोत. या योजेअंतर्गत नगर जिल्ह्यातील 55 हजार जेष्ठ नागरिकांना याचे वाटप केले असून देशातील हा उच्चांक असल्याचे त्यांनी सांगून मतांसाठी आपण कधीच राजकारण केले नाही. विखे पाटील कुटुंबांनी मागील पन्नास वर्षांच्या काळात केवळ समाजकारणास प्राधान्य दिले असून तोच वसा आणि वारसा मी पुढे चालवत असल्याचे सांगितले.

अहमदनगरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण सातत्याने दिल्ली, मुंबई या ठिकाणी फिरत असतो त्यामुळे आपल्या घरगुती कार्यक्रमास येतात येत नाही मात्र याचा काहीजण उलट अर्थ काढून खासदारांचा जनसंपर्क नाही अशा वावड्या उठत आहे, मात्र मी जर विकासासाठी फिरलो नाही तर आपल्या भागासाठी निधी कसा येईल आणि तो कोण आपल्याला देईल? असा प्रतिप्रश्न करून सुजय विखे यांनी तुम्हाला विकास हवा आहे का असे यावेळी विचारले.

मागील एक वर्षात आपल्या भागाचा झपाट्याने विकास होत असून निधीची कुठल्याही बाबतीत कमतरता नाही किंबहुना आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कमी पडू देणार नाही असा विश्वास व्यक्त केला.

प्रारंभी खा.सुजय विखे पाटील, आ.राजळे,बँकेचे अध्यक्ष कर्डिले यांच्या हस्ते घाटशिरस येथे प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत पन्नास लक्ष रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर शेवटचा श्रावणी सोमवार निमित्त श्री क्षेत्र वृद्धेश्वरास (आदित्यनाथ) अभिषेक करण्यात आला. त्यानंतर टॉप टेन खासदार डॉ.सुजय विखे यांची वर्णी लागल्याने त्यांचा पाथर्डीत अड प्रतिक दादा खेडकर मित्र परिवाराच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी श्री काशिनाथ पाटील, श्री अर्जुन शिरसाठ,श्री पुरुषोत्तम आठरे, देवस्थान समितीचे अध्यक्ष गणेश पालवे,बबन सबणस, महेश बोरुडे, अजय रक्ताटे,मुरलीधर पालवे, पृथ्वीराज आठरे, संभाजी वाघ, संजय बडे नितीन गर्जे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!