spot_img
spot_img

दुष्काळी परीस्थीती ओढवलेल्या गावामध्ये तातडीने पाण्याचे टॅकर उपलब्ध करून द्यावी प्रशासनाला सूचना – ना. राधाकृष्ण विखे पा. ,पिण्यासाठी पाणी आणि जनवारांसाठी चारा हाच सरकारचा प्राधान्यक्रम

संगमनेर दि.११ ( जनता आवाज  वृत्तसेवा):-दुष्काळी परीस्थीती ओढवलेल्या गावामध्ये तातडीने पाण्याचे टॅकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून,पिण्यासाठी पाणी आणि जनवारांसाठी चारा हाच सरकारचा प्राधान्यक्रम आहे.पाणी उपलब्ध असलेल्या भागात चारा उत्पादनासाठी शेतकऱ्याना बियाण देण्याचाही निर्णय सरकारने घेतला असल्याची माहीती महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

तालुक्यातील कसारे येथे सुरू असलेल्या अखंड हरीनाम सप्ताहास भेट देवून भाविकांशी संवाद साधला.यानिमिताने ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या समस्यावर मंत्री विखे पाटील यांनी कसारे गावात मागणी प्रमाणे ताताडीने टॅकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. निळवंडे कालव्यातून पाणी सोडण्याचे नियोजन झाले आहे.मात्र अकोले तालुक्यातील काही भागात कालव्यांच्या कामातील त्रृटी तातडीने दुरूस्त करण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत.याचे कामही वेगाने सुरू असल्याचे स्पष्ट करून पहील्या चाचणीच्या वेळी पाणी गळतीमुळे शेतकर्यांचा संघर्ष पुन्हा निर्माण होवू नये हा प्रयत्न आहे.लाभक्षेत्रात सर्वाना पाणी देण्याची भूमिका सरकारची असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावर्षी पावसाने दडी मारल्याने खरीपाचे मोठे नूकसान झाले आहे.अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे.परंतू सरकार यासर्व परीस्थीतीबाबत गंभीर असून धरणात उपलब्ध असलेला पाणी साठा पिण्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला असून,पशुधन वाचविण्याचे मोठे आव्हान आहे.यासाठी ज्या भागात पाण्याची आहे तिथे चारा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना बियाण उपलब्ध करून देण्यात येणार असून मूर घासही कमी दराने देण्याचा निर्णय शासन स्तरावर करण्याचे सुतोवाच त्यांनी केले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने चांगले निर्णय घेतले असून,आघाडी सरकारच्या काळात खाली आलेले दर लक्षात घेवून आता किमान ३४ रूपये दर देण्याबाबत कार्यवाही सुरू झाली असल्याचे स्पष्ट करून लम्पि साथ रोगाच्या संकटात सरकारने सर्व पशुधनाचे लसीकरण मोफत करून दिले आहे.आता दुसर्या लाटेत वासरांना या साथ रोगाचा झालेला त्रास लक्षात घेवून पुन्हा मोफत लसीकरण करण्याचा निर्णय पशुसंवर्धन विभागाने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.ग्रामस्थांनी सभागृहाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासित केले.

तुम्हालाही देवदर्शनाला घेवून जावू! शिर्डी मतदार संघातील महीलांना पंढरपूर आणि तुळजापूर येथे दर्शनासाठी आयोजित केलेल्या सहलीचा मुद्दा महीलांनी उपस्थित केला,काळजी करू नका आम्ही तुम्हालाही दर्शनाला घेवून जावू असे आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!