राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा ):- सांकुरी गावचे तलाठी श्री कृष्णा संपत राव शिरोळे यांना नुकताच आदर्श तलाठी पुरस्कार मिळाला असून महसूल दिना निममीत राहता तहसील कार्यालय मध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला.
या पुरस्कार सोहल्याप्रसंगी राहत्याचे तहसीलदार श्री अमोल मोरे,उपविभागीय अधिकारी माणिक आहेर,बिडिओ श्री जालिंदर पठारे उपस्थित होते मागील ३ वर्षांच्या कालावधीमध्ये श्री शिरोळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली असून त्यांचेकडे सांकुरी ,राहता ,पिंपळस या गावाचे अतिरिक्त तलाठी पद आहे त्या हा पूरस्कार मिळालया बद्दल साकुरी गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला या वेळी संदीप दंडवते ,उपसरपंच रावसाहेब बनसोडे,आनंद रोहोम आदि उपस्थित होते .
श्री कृष्णा शिरोळे यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये सर्वसामान्य जनतेची खूप कामे केली असून त्यांनी कामासाठी कुणाचीही अडवणूक केलेली नाही त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्हा साकुरी वासीयन आनंद झाला आहे -संदीप दंडवते




Total Users : 625322