spot_img
spot_img

कनगर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी एकमताने बाळासाहेब गाढे यांची निवड

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ) :-राहुरी तालुक्यातील कनगर ग्रामपंचायत च्या उपसरपंच जुबेदाबी महमदभाई इनामदार यांनी राजीनामा दिल्याने आज ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंच पदासाठी बैठक झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री सर्जेराव घाडगे हे होते.

उपसरपंच पदासाठी अर्ज करण्याची मुदत सकाळी दहा ते बारा हि वेळ होती. मुदतीत श्री बाळासाहेब गाढे यांचा एकमेव अर्ज आल्याने अर्जाच्या छाननी नंतर अध्यक्ष सर्जेराव घाडगे यांनी श्री बाळासाहेब गाढे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब गाढे, आश्विनी संदीप घाडगे, नंदाकिनी भगवान घाडगे, जुबेदबी महमदभाई इनामदार, छायाताई गाढे, भाऊसाहेब आड भाई, मनीषा राजेद्रा दिवे, सीमाताई गोरक्षनाथ घाडगे धनंजय बर्डे, रामदास दिवे, अर्चना रंगनाथ घाडगे ई ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी संभाजीराव निमसे उपस्थित होते.

सरपंच सर्जेराव घाडगे यांनी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानले व सर्व सदस्यांनी नूतन उपसरपंच बाळासाहेब गाढे यांचा सत्कार करून अभिनंदन केले. श्री बाळासाहेब गाढे यांचे ना.राधाकृष्ण विखे पाटील,खा. सुजय दादा विखे पाटील, मा. आ. शिवाजीराव कर्डिले साहेब, सुभाष पाटील साहेब, राव साहेब (चाचा) तन पुरे राजेद्र साबळे, दत्तात्रय गाढे, बाबुराव घाडगे, भाऊसाहेब नाल कर, गोरक्षनाथ गाढे, डॉ. रघुनाथ नाल कर , आण्णासाहेब घाडगे , बाबुराव निमसे, संदीप घाडगे, दादासाहेब घाडगे, विजय गोरे ई सह भारतीय जनता पक्षाच्या नेते व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!