माळवाडगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- माळवाडगाव येथे कृत्रिम पावसाचा प्रयोग..राजे मराठी (संशोधक) यांनी यांनी शास्त्र युक्त पद्धतीने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी सांगितलेल्या पद्धतीचा उपयोग करून युवकांनी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केलेला प्रयोग – अशी माहिती नानासाहेब आसने(तंटा मुक्ती उपाध्यक्ष माळावडगाव) यांनी दिली चालू वर्षी महाराष्ट्रात तसेच अहमदनगर जिल्ह्यात टाकळीभान मंडळामधील माळवाडगाव मुठेवाडगाव भामाठाण खानापूर इत्यादी गावामध्ये जून ते सप्टेंबर अखेर ते आज पावतो अल्प स्वरूपाचा 25% पेक्षाही कमी पाऊस पडल्याने खरीपा मधील सर्वच पिके वाळून करपून गेली आहेत
आणि आता परतीचा मान्सून चालू होण्याच्या स्थितीत असल्याने तशी पावसाची शक्यता कमीच आहे आज आकाशामध्ये भरपूर ढग जमा झाले असल्यामुळे जर आपण कृत्रिम पावसाचा प्रयोग केला तर मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल….म्हणून माळवडगाव येथील तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत मोरे लिंब या परिसरामध्ये ट्रॅक्टरचा निकामी टायर लाकडं मीठ शेराचे लाकडं रुईचे पान बेशरम इत्यादी साहित्य वापरून धूर करून कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयोग केला या दुष्काळ परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारला व शेतकऱ्याला भविष्यामध्ये पिण्याचे पाणी टँकरने द्यावे लागेल शिवाय पाणीटंचाई बरोबर जनावरांच्या चाऱ्यांचाही प्रश्न बिकट होईल तसेच अन्नधान्याचा तुटवडा ही भासेल त्यामुळे बेरोजगारी वाढेल याचबरोबर महागाई वाढेल शिवाय यामुळे चोऱ्या माऱ्याही जास्त प्रमाणात होतील शिवाय हा सर्व खर्च भविष्यकाळामध्ये शासनालाच करावा लागेल यासाठी शासनाने कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करून कृत्रिम पाऊस कसा महाराष्ट्रामध्ये पडेल याकडे जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे…..
जर कृत्रिम पाऊस पडला गेला तर वरील संकटे कमी होऊन सरकारचाही मोठा ताण कमी होईल यामुळे शासनाने ही कृत्रिम पाऊस पाडणे आवश्यक आहे
यावेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुदामराव आसने, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष नानासाहेब आसने, सामाजिक कार्यकर्ते योगेश लटमाळे ,शेतकरी संघटनेचे भबू पठाण, पिंटू अनुसे, दत्तात्रय मोरे, बाळासाहेब गाडे, अमोल मोरे कलीम पठाण, राजू मोरे, गणेश मोरे, बाबासाहेब आसने ,सुभाष मोरे, रावसाहेब नाना काळे, अशोक लटमाळे, सुदाम आसने, जयदीप आसने, मुठेवाडगाव चे सोपानराव राजू, भगवान आसने ,उद्धव आसने ,जगन्नाथ आसने, भास्कर आसने, बाळासाहेब आसने, पत्रकार रवींद्र आसने हे गावकरी उपस्थित होते.



