श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-काँग्रेसने देशाला गरिबी हटावचा नारा दिला. परंतु भाजपा शासित केंद्र सरकारने जी २० परिषदेच्या निमित्ताने गरिबांची घरे पाडून त्यांचे संसार उध्वस्त केले.मोदी सरकार देशातील अनेक प्रलंबित प्रश्नांकडे सोईस्कर दुर्लक्ष करून जी -२० परिषदेत देशाचे खोटे चित्र उभे करत आहे,अशी टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस दिपालीताई ससाणे यांनी केली.
जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने बेलापूर येथे केंद्र सरकार विरोधात मशाल जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी सौ. ससाणे बोलत होत्या.त्या पुढे म्हणाल्या मराठा आरक्षणासाठी शांततेत चाललेल्या आंदोलनामध्ये सरकारने दडपशाही व बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. मणिपूर मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराबाबत मोदी सरकार गप्प बसले. देशातील गरिबी, महागाई, बेरोजगारी, दुष्काळ या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करून जातीपातीचे भांडणे लावत आहे व सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करत आहे. त्यासाठी आपणास सर्वांनी एकत्र येऊन जन आंदोलन उभे करण्याची गरज असल्याचे सौ ससाणे यांनी म्हटले आहे.
साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर यांनी म्हटले की,केंद्रातील मोदी सरकार सर्व सामान्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून सरकारला सर्वसामान्यांचे काहीही घेणं देणं नाही.काँग्रेस पक्षाला त्याग व बलिदानाची मोठी परंपरा आहे. देशाच्या राजकारणाला व भविष्याला दिशा देण्यासाठी काँग्रेसचे मोठे योगदान राहिले आहे. मोदी सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत असंवेदनशील असून सरकार लोकशाहीची गळचेपी करत आहे. मराठा आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीने लाठीमार करण्यात आला.
श्रीरामपूर बाजार समितीचे सभापती सुधीर नवले म्हणाले की,राज्य संकटांनी ग्रस्त आहे. दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात महागाई वाढल्यामुळे सर्वसामान्यांची जिने मुश्किल झाले आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही. केंद्र व राज्य सरकारला मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मशाली घेऊन भाजप सरकार विरोधात जोरदार निदर्शने करत घोषणाबाजी केली. याप्रसंगी बेलापूर सोसायटी चेअरमन शेषराव पवार, संचालक अशोकराव कोरे शिवाजीराव वाबळे पाटील,अनिल पाटील नाईक, बाबूलालभाई शेख, कैलासशेठ चायल, आलम शेख, रामदास बडधे, बाळासाहेब जोशी, शेलार, जाकीर सय्यद, हरिभाऊ बडाख, विजय शेलार, बाळासाहेब लगे, संतोष कु-हे, यशवंत नाईक पा, सदस्य रमेश अमोलिक, जब्बार सय्यद, प्रमोद भोसले पा. पो.पा.अशोक प्रधान,हुसेन सय्यद, वाकडे पा,आबासाहेब माळी, नितीन खोसे, बाळासाहेब थोरात, बाबासाहेब कर्डिले, भाऊसाहेब थोरात, सचिन कुऱ्हे, रितेश गिरमे, गौरव कुऱ्हे, बंटी पवार, गौरव सिकची, चेतन कुऱ्हे, महेश बडधे, योगेश उंडे,संभाजी लिप्टे, गणेश कुऱ्हे, मधुकर म्हस्के, सोमनाथ शिंदे, सनी मंडलिक,अजय धाकतोडे, आयजुभाई सय्यद, रावसाहेब तांबे, बाबासाहेब मोरे, राजेंद्र जाधव, अशोक शिंदे, वैभव कुऱ्हे, कुणाल पाटील, गोपाल भोसले,अकील बागवान, प्रशांत आल्हाट, तुषार कुऱ्हे, झियान पठाण,तीर्थराज नवले,शिवतेज गोसावी,मा. नगरसेविका संगीताताई मंडलिक, सुजाताताई भळगट, राणीताई देसरडा, आशाताई परदेशी, त्रिवेणी गोसावी, मंगल खंडागळे, पद्मा भोसले, रमा म्हस्के, ज्योती शिंदे श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस, युवक काँग्रेसचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



