वैजापूर( जनता आवाज वृत्तसेवा ):-वैजापूर येथील शिरसगाव शिवारात बुधवारी रात्री ला एक बिबट्या विहिरीत पडलेला असल्याची बातमी बातमी वाऱ्यासारखी पसरली.
दिवसा गुरुवारी बघ्यांची गर्दी झाली होती.वनविभाग व पोलिस यंत्रणा यांनी आतोनात प्रयत्न करुन ट्रेक्टर च्या सहृयाने बिबट्या ला सुखरुप दुपारी दोन वाजेच्या सुमारास बाहेर काढून वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. शिवारातील अनिल निंबाळकर यांच्या शेतगट क्रमांक २४७ मधील विहिरीत बिबट्या पडल्याची बातमी मिळताच विरगाव पोलिस व वनविभागाच्या कन्नड सहाय्यक वनपर्यवेक्षक राजेंद्र नाळे वैजापूर व परिक्षेत्र अधिकारी शंकर कवठे, आसमा सय्यद शेळके यांच्या सह विरगाव पोलिस ठाण्याचे ए, पी,आय शरदचंद्र रोडगे हेड कॉन्स्टेबल व्ही,एम,बामंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन विरहित पिंजरा सोडण्यात आला पिंजऱ्यात बिबट्या ला धरले असता ट्रॅक्टर च्या सहृयाने पिंजरा वर उचलून काढून त्याला सुखरूप सुटका करण्यात आली बिबट्या ला किरकोळ जखमा झाल्या आहेत तो दोन ते अडीच वर्षांचा अंदाज आहे.