कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा):- आज पवित्र ४ थ्या श्रावणी सोमवार निमित्त संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने युवानेते विवेकभैया कोल्हे यांच्या संकल्पनेतून गंगा गोदावरी महाआरतीचे आयोजन गोदावरी तिरी मोठ्या उत्साहात संपन्न झाले..
दुष्काळजन्य परिस्थितीत गोदावरी माता अखंडपणे वाहती रहावी,धरणे काठोकाठ भरलेली असावी व संपूर्ण महाराष्ट्रासह आपले कोपरगाव हे गोदातीरी आहे ते सुजलाम सुफलाम व्हावे,शेतकरी कष्टकरी व व्यापारी आणि सामान्य जनजीवन आनंदी असावे यासाठी युवानेते विवेकभैय्या कोल्हे आणि सौ.रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत साधू संतांच्या आशीर्वादाने शेकडो नागरिकांनी गोदामातेची आरती करून प्रार्थना करण्यात आली..
या प्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी राष्ट्रसंत जनार्धन स्वामी महाराज मठाचे मधाधिपती प.पु.रमेशगिरीजी महाराज, महामंडलेश्वर १००८ शारदानंदगिरी माताजी, प.पु. उंडे महाराजजी, प.पु.कैलासनंदगिरीजी महाराज, प.पु.गोवर्धनगिरीजी महाराज, श्री प्रमोदजी जोशी गुरु आणि संच यांनी पौरहित्य केले तसेच प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, महिला भगिनी,भजनी मंडळ , बालगोपाल, पत्रकार बंधू,युवासेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



