कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाचच्या सत्र पोलीस उपअधीक्षक पदी सचिन मुरलीधर डहाळे यांची निवड करण्यात आली आहे.
सचिन डहाळे यांची पोलीस उपअधीक्षकपदी निवड
पोलीस कॉन्स्टेबल ते पोलीस उपअधीक्षक असा त्यांचा पोलीस खात्यातील प्रवास आहे. त्यांनी पोलीस सेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह सह 304 विविध पारितोषिक मिळाली आहेत. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील त्यांना आवड असून वृक्षारोपणाची मोठी कामगिरी त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री.अजितदादा पवार, महसूल पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री मा. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील,आमदार श्री.राहुलदादा कुल, अखिल भारतीय सुवर्णकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री संतोषशेठ वर्मा,अखिल भारतीय सुवर्णकार संघाचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष श्री प्रमोदशेठ बेद्रे,महाराष्ट्र राज्य गोल्ड व्हॅलीवर्स फेडरेशनचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डॉ. श्रीकांत बेद्रे यांनी अभिनंदन केले.त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.