spot_img
spot_img

काही जणांकडून विकासकामात खोडा आणण्याचे काम-सभापती नवले

श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-बेलापुर गावाला प्रथमच कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती पद उपसभापती पद तसेच सचिव पदही मिळालेले असुन गावात विकास कामे होणे अपेक्षित असताना काही मंडळी विकासकामात खोडा आणण्याचे काम करत असल्याचा आरोप बाजार समीतीचे सभापती सुधीर नवले यांनी केला आहे.

प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात सभापती सुधीर नवले यांनी पुढे म्हटले आहे की गावातील व्यापारी व शेतकरी बांधवांच्या अनेक वर्षाच्या मागणीनुसार बाजार समीतीच्या पहील्याच बैठकीत बेलापुर उपबाजार समीतीच्या आवारातील काँक्रीटीकरणाची मंजुरी घेतली तसेच मुख्य बाजार समीती श्रीरामपुर व उपबाजार समीती टाकळीभान येथील कामाचेही प्रस्ताव पणन संचालक यांच्याकडे मंजुरीसाठी तयार केलेले आहेत मात्र बाजार समीतीचे उपसभापती व गावाचे उपसरपंच अभिषेक खंडागळे हे केवळ राजकीय ताकदीचा वापर करुन दबाव तंत्राचा अवलंब करुन विकास कामात खिळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत .त्यांनी अन्य दोन संचालक नानासाहेब पवार व सुनिल शिंदे यांच्या स्वाक्षरी घेवुन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तक्रार केली असुन त्यात या विकास कामांच्या प्रस्तावाला मंजुरी देवु नये असे म्हटले आहे .

खरे तर गावाच्या विकासात राजकीय जोडे बाजुला ठेवुन एकदिलाने काम करणे अपेक्षित होते .परंतु केवळ मोठमोठी भाषणबाजी करायची लोकांची दिशाभूल करायची ही यांच्या कामाची पद्धत आहे हे साऱ्या गावाला जाँगींग ट्रँकच्या कामातुन माहीत झाले आहे जाँगींग ट्रँकचा फार मोठा गवगवा झाला मोठ्या प्रमाणात निधीही खर्ग झाला अन त्या जाँगींग ट्रँकचा जोकींग ट्रँक झाला आपण बोगस व चुकीची कामे करायची अन दुसऱ्याच्या कामात तंगडी अडवायची ही यांची पद्धत आहे यांच्या ओठात एक अन पोटात एक आहे .केवळ राजकीय कावीळ झाल्याने त्यांच्या असणाऱ्या महाभागाच्या सांगण्यावरुनच विकास कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत असेही नवले यांनी शेवटी म्हटले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!