spot_img
spot_img

प्रवरा औषधनिर्माणशास्र महाविद्यालयाची अनिश फार्माला भेट

लोणी दि.१२( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्माभूषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्र महाविद्यालयाची नुकतीच अनिश फार्माला औद्योगिक भेट दिल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी दिली.

नवीन शैक्षणिक ध्येय धोरणनुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रबरोबर प्रात्यक्षिक पद्धतीने फार्मा कंपनी मध्ये चालणाऱ्या कार्यपद्धतीची माहिती व्हावी हा या भेटीचा उद्देश होता. या उद्देशाने तृतीय वर्षासाठी अनिश फार्मा , नाशिक या नामांकित फार्मा कंपनीमध्ये शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

फार्मा कंपनी मध्ये लागणाऱ्या विविध उपकरणे बनविण्याचे काम हि कंपनी करत असून त्याच बरोबर संशोधन व विकासाचे हि काम इथे चालू आहे. प्रामुख्याने विद्यार्थ्यांना काही अद्यावत उपकरणावरती त्यांनी प्रात्यक्षिक करून शैक्षणिक अभ्यासक्रमातील महत्वाच्या बाबी समजावून सांगितल्या. फार्मा कंपनी मध्ये लागणाऱ्या विविध अद्यावत उपकरणे विद्यार्थांनी अभ्यासली. विद्यार्थाना नवनवीन उपकरणे व त्यातील काही नवीन तंत्रज्ञान चे अध्ययन या भेटीमधून झाले. अनिश फार्मा चे प्रमुख श्री रवी सामंत व मानव संसाधन प्रमुख यादवी पवार यांनी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालय व अनिश फार्मा मधील झालेल्या सामंजस्य कराराचा एक भाग म्हणून या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा अभ्यासक्रम व्यतिरिक्त भविष्यात नोकरीसाठी होणार आहे.महाविद्यालयात स्वतंत्र ट्रैनिंग व प्लेसमेंट विभाग कार्यरत असून या विभागंतर्गत या शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रैनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ.सोमेश्वर मनकर, डॉ.सुहास सिद्धेश्वर, व प्रा. स्नेहल बोरनारे,प्रा. प्रज्वली भालेराव यांनी विशेष परिश्रम घेतले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!