spot_img
spot_img

साकुरी येथे आनंदाचा शिधा वाटप सुरू

राहाता (जनता आवाज वृत्तसेवा): –महाराष्ट्र राज्य सरकारच्या पुरवठा विभागा मार्फत आनंदाचा शिधा वाटप साकुरी येथे सुरू करण्यात आले आहे.

गणेश चतुर्थी च्या पार्श्वभूमीवर शासनाने हे वाटप सुरू केले असून या आनंदाच्या शिध्या मध्ये सर्व नागरिकांना 100 रुपये मध्ये एक किलो साखर,एक किलो डाळ,एक लिटर तेल,व एक किलो रवा मिळणार आहे महाराष्ट्र शासन वर्षा मधून तीन वेळेस या शिध्या चे वाटप करत असते महाराष्ट्र शासन पुरवठा विभाग तसेच राहाता तालुका पुरवठा विभाग यांचे वतीने आज साकुरी येथे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार्याने सदरील आनंदाचा शिधा वाटप सुरू करण्यात आले आहे.

यावेळी श्री दिनकर बावके,मधुकर दंडवते,प्रकाश डांगे,तलाठी कृष्णा शिरोळे,सांडूभाई सय्यद,भास्कर पोटे आदी उपस्थित होते

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!