spot_img
spot_img

धनगर आरक्षण आंदोलन महाराष्ट्रभर धडकणार – राजेंद्र तागड

करंजी( जनता आवाज वृत्तसेवा ) : –अहिल्यामाई यांच्या जन्मस्थळावर धनगर आरक्षण आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला असून, आयोजक यशवंत सेना असली धनगर आरक्षणाचा वनवा आता हा महाराष्ट्रभर धडकणार असून, ७६ वर्षांत धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झालेली नाही,

सर्वच राजकीय पक्षांनी धनगर समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक केली असून, फडणवीस सरकाने सुद्धा योजनाचे गाजर दाखवून आरक्षणापासून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र तागड यांनी केला आहे. ज्या ज्या वेळी आरक्षणासाठी आंदोलन झाली, त्या त्या वेळी धनगर समाजातील एखाद्या व्यक्तीला आमदार खासदार महामंडळ देऊन आंदोलन गुंडाळण्यात आले असून, समाजाला दिशाहिन केले जात आहे. धनगर समाजबांधवांनी आंदोलन हातात घेऊन जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत चौंडी येथील उपोषण सुरूच राहणार आहे.

मंत्र्यांवर भंडारा उधळुन धनगरांच्या मनातली रोष व्यक्त केला आहे. दोन तीन दिवसानंतर प्रत्येक धनगर समाजबांधवांनी या लोकशाही आंदोलनात सहभागी होऊन आरक्षण मिळवण्यासाठी सरकारकडे आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवण्याचे आवाहन ज्येष्ठनेते राजेंद्र तागड यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!