लोणी दि.२( जनता आवाज
वृत्तसेवा ):-महसूलचे विविध दाखले काढणे आता ऑनलाईनव्दारे सुलभ झाले आहे.लोकशाही भक्कम होण्यासाठी सर्वानी मतदार नोंदणीसह मतदान करुन लोकशाही भक्कम करावी युवा पिढी देशाचे भविष्य आहे युवकांनी शासकिय योजनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी पुढाकार ध्यावा असे प्रतिपादन राहात्याचे निवासी नायब तहसीलदार रावसाहेब ओहोळ यांनी केले.
शासनाच्या वतीने महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित महसूल सप्ताह निमित्त दिनांक १ ते ७ ऑगस्ट हा सप्ताह महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्यात होत आहे. त्या निमित्ताने दिनांक २ ऑगस्ट रोजी गृहविज्ञान महिला महाविद्यालयात राहता तहसील कार्यालया तर्फे ‘युवासंवाद ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात महाविद्यालयातील युवतींना मतदान नोंदणी महसूल विभागाच्या विविध योजना तसेच विविध कागदपत्रे मिळविण्याची प्रक्रिया जसे उत्त्पन्न दाखला नॉन क्रिमीलेअर, अधिवास दाखला, विविध दाखल्यांची माहिती तलाठी सौ.एम्. एस. देवकर यांनी दिली
या कार्यक्रम प्रसंगी कटारे, नितीन घोगरे, माने आदी उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुश्री खैरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तर सूत्रसंचालन प्रा . रुपाली नवले यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. कांचन देशमुख प्रा . संजय वाणी आदींनी प्रयत्न केले.