श्रीरामपूर ( जनता आवाज
वृत्तसेवा ):-जीवन सुखी व समाधानी जगायचे असेल तर भक्ती मार्गाचा अवलंब करा. मुलांना सुसंस्कारीत करा आचरण शुद्ध ठेवा कुणाशी कपटनिती ठेवुन वागु नका.खोटे बोलु नका असा उपदेश सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगीरी महाराज यांनी दिला . आदिक मास निमित्त माहेश्वरी समाजाच्या वतीने बालाजी मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात भाविकांना उपदेश करताना महंत रामगीरी महाराज पुढे म्हणाले की मुलावर चांगले संस्कार करा तीच आपली संपत्ती आहे पैशाच्या मोहापायी जिवनातील आनंद गमावुन बसु नका मनुष्य जन्म हा एकदाच आहे याची जाणीव ठेवा प्राणीमात्रावर दया करा हिंसा करु नका भक्ती हे जीवनाचे सार आहे.ज्याच्याकडे समाधान आहे तो सर्वात सुखी माणूस आहे त्यामुळे समाधानी रहा सुख आपोआप प्राप्त होईल .कोरोना काळ सर्वांनी अनुभवला आहे आपल्या गरजा किती आहे ते कोरोनाने आपल्याला शिकविले आहे
घरात बसुन देखील आपण आनंदात जीवन जगत होतो त्यामुळे भौतिक सुखाच्या मागे धावताना दुःख पदरात घेवु नका जीवानाचा खरा आनंद कशात आहे हे जाणून घ्या सर्व संपत्ती येथेच सोडून आपल्याला जायचे आहे आपल्या बरोबर केवळ आपले कर्मच येणार आहे त्यामुळे सत्कर्म करा आसा उपदेशही महंत रामगीरी महाराज यांनी दिला या वेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा ,राजेश खटोड , रामविलास झंवर ,संजय राठी ,दिपक सिकची ,रामप्रसाद झंवर किराणा मर्चंडचे अध्यक्ष शांतीलाल हिरण ,भरत सोमाणी ,गोविंदराम दायमा ,विशाल वर्मा ,पत्रकार देविदास देसाई ,वकील संघटनेचे अध्यक्ष अँड विजयराव सांळूके ,सरला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज , विशाल आंबेकर ,प्रशांत खटोड ,गोपाल राठी ,अक्षय लढ्ढा ,मुकुंद चिंतामणी ,प्रमोद पोपळघट ,करण गोसावी ,आदिसह महीला भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या