spot_img
spot_img

श्री शिवाजीनगर नियोजित राहुरी तालुका पावसाळी खो-खो स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने आयोजित श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, श्रीशिवाजीनगर नियोजित राहुरी तालुका पावसाळी खो-खो क्रीडा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

राहुरी फॅक्टरीतील श्री. छत्रपती शिवाजी हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर १४ १७ व १९ वर्षाखालील वयोगटांत संपन्न झाल्या. १४ वर्षाखालील ३०, १७ वर्षाखालील २५ संघ १९ वर्षाखालील ०५ संघाने यात सहभाग तर राहुरी तालुक्यातील ३५ शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य एल.के. संसारे यांच्या हस्ते व पर्यवेक्षिका राणी साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या प्रसंगी शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे, राहुरी तालुका क्रीडा प्रमुख प्रकाश मोढे, तालुका टी.डी.एफ. अध्यक्ष भानुदास तमनर , तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव , बी.एल.शिरसाठ आरपीआयचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे आदी मान्यवर व सर्व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युसुफ तांबोळी यांनी केले तर अध्यक्षीय निवड सुनिल जगताप व दिपक गाडे यांनी अनुमोदन दिले. आभार क्रीडा विभाग प्रमुख नितीन घोलप मानले.

याप्रसंगी शुटींग बॉल असोशिएशन सचिव राजेंद्र पुजारी, पत्रकार गणेश विधे, प्रा. ठोंबरे सर, सौरभ वरखडे, प्रा.भांड सर, कुळधरण सर, विजय साळवे, दादासाहेब वाघ, चांगदेव काळे, विजय नरोडे, भाऊसाहेब जगधने विशाल तागड ,दिघे मॅडम, घाडगे मॅडम, शिंदे मॅडम, अतुल लहारे उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!