लोणी दि.२( जनता आवाज
वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरि ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल च्या सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी व बारावी मधील शालांत व उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेत विशेष गुणांसह प्राविण्य मिळविणाऱ्या अनुसूचित जमातीच्या चार विद्यार्थिनींना शासनाच्या वतीने प्रोत्सहन बक्षीस जाहीर झाले आहे. राज्यामध्ये तसेच पुणे विभागामध्ये प्रथम येण्याचा मान प्रवरेला मिळाला आहे अशी माहीती प्राचार्या भारती देशमुख यांनी दिली.
आदिवासी विकास सह आयुक्त शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांचे संदर्भीय पत्रानुसार विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत कु. गायत्री काशिनाथ पवार ही विद्यार्थिनी ९५.२० टक्के गुण मिळवून आदिवासी मुलींमधून राज्यामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तसेच कु. पूजा बकाराम सुर्यवंशी ही विद्यार्थिनी ९२.८० टक्के गुण मिळवून राज्यांमध्ये पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.तसेच कु. पूजा दिगंबर महाले ही विद्यार्थिनी ९१.६० गुण मिळवून इयत्ता दहावीच्या परीक्षेत पुणे विभागातून तृतीय तर कु. दिपाली कैलास पवार ही विद्यार्थिनी इयत्ता बारावीत विज्ञान शाखेंतर्गत ८५.१७ गुण मिळवून पुणे विभागातून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
या विद्यार्थिनींनी हे नेत्र दीपक यश मिळवत राज्य तसेच विभागीय स्तरावर संस्थेच्या व विद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे. संस्थेच्या तसेच विद्यालयाच्या दृष्टीने हा अत्यंत आनंदाचा अभिमानाचा क्षण आहे अशा शब्दात यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन करताना संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना. राधाकृष्णजी विखे पाटील सांगितले.यशस्वी विद्यार्थ्याचे माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, खा.डाॅ. सुजय विखे पाटील, संस्थेचे सहसचिव भारत घोगरे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ,अतांञिकेचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, शिक्षण समन्वयक श्री नंदकुमार दळे, प्राचार्या भारती देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.
मुलींना सौ.रेखा रत्नपारखी , श्री चांगदेव तांबे, श्री राहुल काळे, सौ.अनिता घोगरे ,सौ.मिनी जोसेफ, सौ. सायरा शेख , सौ.मनिषा गायकर , सौ संजीवनी सांबरे , सौ.विजया वाघ, सौ.शोभा गागरे , सौ.अनिता गोर्डे , सौ. प्रतिभा वर्पे, कु. निशिगंधा पाचोरे, सौ. धनश्री विखे, कु. प्रियंका शिंदे,सौ.जयश्री निर्मळ , कु.पुनम जेजूरकर श्री. दिलीप कल्हापूरे यांनी व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांचे मार्गदर्शन लाभले.