3.8 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

सण २०२२ सप्टेंबर, ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसात शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसान अनुदान तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना मिळावे-शेतकरी संघटनेने दिले तहसीलदारांना निवेदन.

नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा):- नेवासा तालुक्यात अतिवृष्टी आणि संततधार ग्रस्त सप्टेंबर-ऑक्टोबर- २०२२ मधील शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यात भेदभाव झाला, तसेच अतिवृष्टी आणि संततधार ग्रस्त शेतकऱ्यांना कोणतीही शासकीय मदत आता पर्यन्त शेतकऱ्यांना न मिलल्याबाबत शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यां आक्रमक होत तहसीलदार संजय बिराजदार यांना निवेदन देऊन उर्वरित पाच ही महसूल मंडळांना अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान मिळावे व तसेच ज्यांनी मागील पीक विमा योजनेत सहभाग नोंदवून देखील पीक विम्याची परताव्याची रक्कम जमा झाली अश्या शेतकऱ्यांना लवकर हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे अशी मागणी निवेदन द्वारे करण्यात आली.
    

 निवेदनात म्हटले की नेवासा तालुक्या मध्ये पिक विमा कंपनी द्वारे पिक विमा देण्यात भेदभाव करण्यात आला. संततधार अथवा अतिवृष्टी एकाच गावात वेगवेगळी होणे शक्य नाही. अशा परिस्थितीत शेजारील शेतक-याला पिक विमा येतो पण दुसरा शेतकरी या योजनेत सहभागी होऊन देखील वंचित राहतो अशी परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे.तसेच शासकीय अनुदानाच्या समाज माध्यमांवर केवळ यादी फिरते आहे. शेतक-यांचे नुकसान होऊन देखील आता पर्यन्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्याचा मोबदला मिळाला नाही.
   
  अद्याप  तालुक्यात फ़क्त अतिवृष्टी यादी फिरत आहे.व ज्या शेतकऱ्यांचे या यादीत नावे अश्या शेतकऱ्यांनी के वाय सी प्रमाणीकरण करण्याचे सांगितले, त्यात जवळपास बरेश्या शेतकऱ्यांनी केले देखील तरी देखील आजून पैसे जमा नाही.त्यात तालुक्यातील बरेश्या शेतकऱ्यांच्या नावे देखील नाही,तर अश्या शेतकऱ्यांना देखील हे नुकसान अनुदान प्राप्त झाले पाहिजेन.व पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळाली पाहिजेन. तसेच तालुक्यात पिक विमा कंपनीचे कार्यलय पाहिजेन त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येणार नाही.
    
 यासाठी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्ते यांनी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे म्हणून रस्ता रोको,उपोषण केले.पण आता १५ ऑगस्ट पर्यन्त जर शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान अनुदान व मागील पीक विम्याची रक्कम मिळाली नाही तर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मोठा रस्ता रोको करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
    
 यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष त्रिंबक भदगले जिल्हा उपाध्यक्ष हरीभाऊ तुवर नरेंद्र काळे डाॅ रोहित कुलकर्णी कैलास पवार बाबासाहेब नागोडे किरण लंघे अशोक नागोडे संजय बोरुडे शशिकांत मतकर बाळासाहेब सरोदे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
आमची शेतकरी संघटना कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.सध्या शेतकरी अडचणीत असून शेतकऱ्यांना समोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहे.शेतकऱ्यांच्या शेती मालाला भाव नाही.अश्यात मागील वर्षी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत आजून मिळाली नाही.लवकरात लवकर नुकसान भरपाई अनुदान तालुक्यातील पाच महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना मिळावे,तसेच पीक विम्यात मागील वर्षी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून देखील विम्याची रक्कम मिळाली नाही.तरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ ऑगस्ट च्या आता अनुदान व विम्याची रक्कम जमा करावी अन्यथा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मोठा रस्ता रोको करण्यात येईल.
   हरिभाऊ तुवर (शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष),पाचेगाव

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!