राहाता (जनता आवाज वृत्तसेवा ):-वरुण राजाला प्रसन्न होवू दे…शेतकरी व सामान्य जनतेच्या आयुष्यात समृद्धी येवु दे अशी प्रार्थना डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी बैलपोळ्या निमित्त बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करताना केले.
बैलपोळ्या निमित्त डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्या निवासस्थानी बैलांचे पुजन करण्यात आले.यावेळी मदनलालजी पिपाडा,राहाता येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी आनप,सागर आनप,लिलाबाई पिपाडा,माया पिपाडा,साहील पिपाडा,कुणाल काळे आदी उपस्थित होते. यावेळी पिपाडा कुटुंबातील महिलांनी बैलांची पुजा करुन पारंपारीक पद्धतीने पुरणाची पोळी, सुपामध्ये धान्य खावयास देवून त्यांचे औक्षण कऱण्यात आले. अत्यंत उत्साहात बैलपोळा सण साजरा कऱण्यात आला.
आज राज्यभर दुष्काळाचे संकट उभे राहीले आहे. पर्जन्यवृष्टी न झाल्यामुळे शेतक-याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. अजुनही वेळेवर कॅनोलचे पाणी न मिळाल्यामुळे शेतक-याच्या हातातुन पीक निघुन गेले आहे. शेतकरी पुरता हाताश झाला आहे. संपूर्ण देश हा शेती व शेतक-यावर अवलंबुन आहे. शेती व शेतक-यामधील महत्वाचा दुवा म्हणजे बैल असतो. आज या सणानिमित्ताने बैलराजाला माध्यमातुन निसर्गदेवतेला लवकरात लवकर पर्जन्यवृष्टी होवुन संपूर्ण राज्याला दुष्काळ मुक्त कर अशी प्रार्थना करण्यात आली.



