राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ) :-पांडुरंग लॉन्स राहुरी येथे दिव्यांग योजने अंतर्गत (एडिप), सामाजिक अधिकारिता शिबिर व लाभार्थ्यांना निशुल्क सहायक उपकरण वितरण खासदार.डॉ. सुजयदादा विखे पाटील व जिल्हा बँकेचे चेअरमन श्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी दिव्यांग बांधवांशी संवाद साधला.श्री अमोल भनगडे, श्री सुभाष गायकवाड यांची भाजपा उपजिल्हाध्यक्ष पदी व श्री सुरेश बानकर यांची तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.याप्रसंगी जेष्ठ नेते श्री. अँड सुभाष दत्तात्रय पाटील,श्री नामदेव ढोकणे,श्री रावसाहेब तनपुरे,
श्री. उत्तमराव पा. म्हसे,श्री. मुरसिंगराव पवार श्री. शिवाजीराव गाडे पा,श्री. मधुकर पवार श्री. शाम का निमसे श्री. अर्जुनराव बाचकर,श्री. आसाराम ढुस,श्री दत्तात्रय ढुस, श्री. सुरेश बानकर, श्री युवराज गाडे, श्री तानाजीराव पा. धसाळ, श्री राजेंद्र पा. उडे, श्री नयन शिंगी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



