spot_img
spot_img

स्वातंत्र्या नंतर पहिल्यांदाच दिव्यांगाच्या बाबतीत विचार करणारे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी – खा.डॉ.सुजय विखे पाटील

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंचाहत्तर वर्षा पेक्षा जास्त वर्ष झाली मात्र दिव्यांगाच्या बाबतीत एकाही लोकप्रतिनिधींनी विचार केला नाही मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच एकमेव असे नेते आहेत ज्यांनी दिव्यांगांच्या बाबतीत विचार करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी संकल्पना मांडली आणि याच संकल्पनेतून या बांधवांना साधन साहित्याचे वाटप करत असल्याचे खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

राहुरी येथे दिव्यांगाच्या साधन साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना ते म्हणाले की मागील नऊ वर्षाच्या कालखंडात केवळ देशासाठी अहोरात्र काम करणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजातील सर्व घटकांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या त्या योजनांची अंमलबजावणी देखील यशस्वीपणे केली, हे करत असतानाच दिव्यांगाच्या बाबतीत काही तरी करून समाजात त्यांना सन्मानाने जगता यावे , स्वयंपूर्ण होता यावे याकरिता त्यांनी साधन साहित्य देण्याची संकल्पना मांडली आणि याच संकल्पनेतून आजचा हा कार्यक्रम आपण घेत असल्याचे त्यांनी सांगितले. दिव्यांगाना या साधन साहित्याचे वाटप करताना खूप समाधान मिळत असून यातून पुण्यचं मिळणार असल्याचे सांगताना विखे पाटील कुटुंबियांनी समाजकारणास कायम प्राधान्य दिले आहे, या साधन साहित्य वाटपा तून कुठलेही राजकारण केलेलं नाही. हे साहित्य कोणाला मिळत आहे हे सुद्धा न पाहता केवळ गरुजूना याचा लाभ घेता यावा हा उद्देश ठेवून ही संकल्पना पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले.

2019 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रित लढले, परंतु खुर्चीच्या हव्यासा पोटी गद्दारी करून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सरकार आणले, या सरकारच्या कार्यकाळात घरून कारभार सुरू होता त्यामुळे आपले पुढारलेले राज्य हे दहा वर्षे मागे गेले, परंतु आपले नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्यांचे असे सरकार राज्यात आणले आणि यानेक वर्षाच्या कार्यकाळात सर्वांना न्याय देण्याचे काम शिंदे – फडणवीस आणि आता नव्याने सरकार मध्ये आलेलं अजित पवार हे करत आहेत. गोर गरीब जनतेसाठी अहोरात्र राज्य आणि केंद्र सरकार काम करत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे तर आता विश्वाचे नेते झाले आहेत असे सांगून खा. विखे यांनी जी-20 परिषदेच्या यशस्वी आयोजनाचा संपूर्ण श्रेय हे मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिले. या आंतररष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजन तून देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशाची अर्व्यवस्था ही आज जगाच्या तुलनेत पाचव्या स्थानावर आहे, ती तिसऱ्या स्थानावर नेण्याचे मोदी यांचे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा देणे गरजेचे असून तिसऱ्यांदा मोदीजी यांना आपल्याला पंतप्रधान करावयाचे असल्याचा निर्धार आपण सर्वांनी करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

या कार्यक्रमात दिव्यांगाना साधन साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच भाजपाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

या कार्यक्रमास सुभाष पाटील अमोल भनगड ,सुभाष गायकवाड, सुरसिंगराव पवार, शिवाजीराव गाडे मधुकरराव पवार, श्याम काका निमसे, नामदेवराव ढोकणे ,आसाराम ढुस ,दत्तात्रय ढुस, सुरेश बानकर, युवराज गाडे, राजेंद्र उंडे ,तानाजीराव धसाळ नयन शिंगी ,उत्तमराव म्हसे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!