spot_img
spot_img

आठ दिवसात नाना गलांडेला अटक करून मोक्का अंतर्गत कारवाई न केल्यास एस पी कार्यालयासमोर रस्ता रोको रिपाईचा इशारा

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- आठ दिवसात नाना गलांडेला अटक करून मोक्का अंतर्गत कारवाई न केल्यास एस पी कार्यालयासमोर रस्ता रोको रिपाईचा इशारा श्रीरामपूर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर समोर १५  सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने हरेगाव प्रकरणातील आरोपी नाना गलांडेला त्वरित अटक करून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करून सावकारकीच्या धंद्यातून लुबाडलेल्या लोकांच्या जमिनी परत करा.

या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मागणीचे निवेदन तालुका पोलीस स्टेशनचे पीआय दशरथ चौधरी यांना रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन विभागीय अध्यक्ष भीमराज बागुल युवक जिल्हाध्यक्ष अध्यक्ष पप्पू बनसोडे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले त्यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात म्हणाले की पंधरा-वीस दिवसापासून श्रीरामपूर पोलिसांना आरोपी नाना गलांडे सापडत नाही याचा अर्थ पोलीस आरोपीला पाठीशी घालत आहे हे आम्ही कधी सहन करणार नाही आठ दिवसात नाना गलांडेला अटक केलं नाही.

तर एस पी कार्यालय अहमदनगर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात यांनी दिला रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन म्हणाले की नाना गलांडे अटक पूर्व जामीन साठी औरंगाबादला किलपात्रावर सह्या करून जातो तरी पोलिसांना थांब पत्ता लागत नाही याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा नाना गलांडे ला त्वरित अटक करून मोकांतर्गत कारवाई न केल्यास श्रीरामपूर बंद मशाल मोर्चा काढणारअसल्याचा सुभाष दादा त्रिभुवन यांनी दिला विभागीय अध्यक्ष भीमराज बागुल म्हणाले की लवकरच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील लवकरच हरेगाव ला येऊन ग्रामसभा घेऊन लोकांच्या सावकारकीतून लुबाडलेल्या जमिनी संदर्भात आढावा घेऊन त्या संदर्भात कारवाई करणार आहेत यावेळी तालुकाध्यक्ष सुनील शिरसाठ शहराध्यक्ष विजय पवार महिला गाडीच्या उ मा. उपाध्यक्ष रमाताई धीवर मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन आव्हाड जिल्हा सरचिटणीस मनोज काळे आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी राजू नाना गायकवाड संजय बोरगे बनसोडे योगेश सुरेश जगताप विशाल सुरडकर प्रदीप कदम सोनू राठोड हितेश पवार मोजेस चक्रनारायण सुशील धायजे करण कोळगे धनंजय निकाळे पंकज भालेराव आयुब पठाण गोविंद दिवे अनिल रणनवरे सिद्धार्थ सगळगिळे रमेश आमोलिक अमोल काळे प्रदीप गायकवाड पप्पू इंगळे दिलीप चव्हाण राम जाधव नाना कदम रवी साळवे सचिन सगळगिळे अर्जुन शेजवळ किरण भोसले प्रवीण बनसोडे अनिल जाधव निशिकांत खरात रविराज क्षेत्रे जब्बर पठाण निखिल पवार सचिन सोनवणे महिला आघाडीच्या स्नेहल दिवे सुनिता दाभाडे उज्वला येवलेकर वंदना म्हशे सुनिता थोरात अंजना सोनवणे सीमा तुपे आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सुभाष त्रिभुवन यांनी केले तर आभार भीमराज बागुल यांनी मानले

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!