23.9 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

राहुरीत भूमिगत गटारीच्या कामाचा आमदार तनपुरेंच्या हस्ते श्री गणेशा.

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- महाविकास आघाडीच्या काळात अनेक कामे मार्गी लावण्यात आली त्यामध्ये शहरातील भुयारी गटारीचे काम मार्गी लावण्यात आले आज त्या भूमिगत गटारीच्या पहिल्या भेज अशा ९२ कोटीच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामाचे उद्घाटन आमदार तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

राहुरी शहरातील १३४ कोटी पेक्षा जास्त रकमेच्या कामाचाही श्री गणेशा आज दिनांक १५ रोजी सकाळी ११ वाजता राहुरी कॉलेज परिसरातून करण्यात आला

यावेळी तनपुरे म्हणाले महाविकास आघाडीच्या काळात आपल्या विचाराचे सरकार असल्याने शहरातील भरपूर कामे मार्गी लावण्यात आली. मी या योजनेसाठी गेले दोन-तीन वर्ष प्रयत्न केला याचा आनंद होत आहे आता कामे आम्ही मार्गे लावली व दुसरेच श्रेय घेत असल्याचे आमदार तनपुरे यांनी सांगितले

यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कासार ,राजेंद्र जाधव, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, बाळासाहेब उडे ,सूर्यकांत भुजाडी,संतोष आघाव, संदीप सोनवणे ,महेश उदावंत, नानासाहेब शिंदे ओंकार कासार, राजेंद्र बोरकर सुजित वाबळे, दशरथ पोपळघट, किशोर जाधव ,विलास तनपुरे संकेत दुधाडे ,गजानन सातभाई, नरेंद्र शिंदे ,बाबासाहेब येवले ,दीपक तनपुरे ,ज्ञानेश्वर जगधने, ऋषिकेश म्हसे ,बाळासाहेब खुळे, प्रकाश भुजाडी, सचिन भिंगारदे, दिनेश तनपुरे गणेश वराळे, योगेश आमटे सावळेराम तनपुरे ,गणेश घाडगे ,अशोक कदम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!