नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):– विविध क्षेत्रात काम करणार्या इंजिनिअर्सच्या सन्मानार्थ कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा खास दिवस म्हणजे ‘इंजिनिअर्स डे’. अभियंता आणि वैज्ञानिक मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधत भारतात १५ सप्टेंबर हा दिवस इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो.
यावर्षीच्या अभियंता दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय नेप्ती येथे विविध स्पर्धांचे आयोजन १४ आणि १५ सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा, रिल्स मेकिंग कॉम्पिटिशन, पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन या स्पर्धांचा समावेश होता. सर्व स्पर्धा मिळून जवळपास १५० पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. जी-२०, चंद्रयान-३, विश्वगुरु भारत, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, असे विषय विविध स्पर्धेसाठी ठेवले गेल्यामुळे विद्यार्थी त्याबाबत चौकस होतील, त्यांच्यातील कौशल्य आत्मविश्वासने सर्वांसमोर मांडतील असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे सर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आयोजित या स्पर्धांसाठी प्राध्यापक जी.एस. पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी प्रतिनिधींनी पुढाकार घेत स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विविध स्पर्धांचे वेळापत्रक नियोजनबद्ध केले. सिव्हील विभागाचे प्रमुख प्रा. पी. जी. निकम, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख प्रा. एस. एम. वाळके, प्रथम वर्ष समन्वयक डॉ. एम. के. भोसले, कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख प्रा. व्ही. व्ही. जगताप, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. ए. बी. काळे यांच्याबरोबरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य या उपक्रमासाठी लाभले. विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करणाऱ्या या स्पर्धांची पारितोषिके इंजिनियर्स डे निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात येतील.