4 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

नुकसानग्रस्त सोयाबीनला बागायत पिकांप्रमाणे मदत द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):-
ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 मधे सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठीची शासकीय मदत श्रीरामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे.परंतु यात सोयाबीन पिकाला शासनाने सरसकट जिरायती प्रमाणे मदत केलेली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रती गुुंठा 100 रुपयांनी कमी मदत मिळाली आहे. म्हणजे हेक्टरी 10 हजारांचा भुर्दंड शेतकऱ्यांना पडला आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन सदर मदत ई-पिक पाहणीनुसार बागायत प्रमाणेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी मागणी त्यांच्याकडे निवेदनाद्वारे श्रीरामपूर येथे केली.त्यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरचे तहसीलदार श्री.वाघ यांना सदर विषयावर अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.
सदर निवेदनावर सुरेश ताके,जितेंद्र भोसले,भरत असने,दिलीप गलांडे,संदीप गवारे,ज्ञानदेव थोरात आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!