27.5 C
New York
Saturday, July 19, 2025

Buy now

spot_img
spot_img

युवानेते विवेकभैय्या कोल्हे ठरले यंग प्रॉमिसिंग पॉलीटिशीअन ऑफ द इयर..

कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा ):- नवभारत ग्रुपच्या वतीने दिला जाणारा मानाचा यंग प्रॉमिसिंग पॉलीटिशीअन ऑफ द इयर या पुरस्काराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांना सन्मानित करण्यात आले.

सामाजिक योगदान,भरीव आणि नेत्रदीपक गरुडझेप घेणारे तरुण आश्वासक राजकीय चेहरा म्हणून महाराष्ट्र ज्यांची दखल घेतो,अशी कमी वयात व्यापक ओळख आपल्या धडाडीच्या कार्यशैलीने विवेकभैय्या कोल्हे यांनी मिळवली. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कोविड सेंटर सुरू करून हजारो रुग्णांना मोफत उपचार देत जीवनदान दिले,वृक्षारोपण,आरोग्य शिबिरे,रक्तदान शिबिरे,सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळे,एक राखी जवानांसाठी,कोपरगाव मतदारसंघात नवीन एम आय डी सी होण्यासाठी असणारे भरीव प्रयत्न,पूर ग्रस्तांना मदत,तरुणांना कॉल सेंटर व अन्य माध्यमांतून रोजगार उपलब्ध करून दिला,गरजू रुग्णांना आरोग्य मदत,२४ तास मोफत रुग्णवाहिका आणि अविरत जणसेवेस्तव वैद्यकीय मदत विभाग अशी लोकोपयोगी कामे विवेकभैय्या कोल्हे यांच्या मध्यामातून सुरू आहेत.याची दखल नवभारत ग्रुपने घेतली आहे.

संघटनात्मक राजकीय यशाची प्रभावशाली वाटचाल सुरू आहे.कोपरगाव मतदारसंघात सर्वाधिक ग्रामपंचायत,सोसायटीत विजय खेचून एकहाती वर्चस्व सिद्ध केले व ग्रामविकासाचा मार्ग सुखकर केला.महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी चर्चा घडणारी श्री गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक विवेकभैय्या कोल्हे यांनी अक्षरशः रोमहर्षक वातावरणात एकतर्फी खेचून आणली आणि राजकीय निरीक्षकांच्याही भुवया उंचावल्या गेल्या.यासह त्यांच्या सामाजिक राजकीय जडनघडणीची दखल घेऊन नवभारत ग्रुप आणि देवेंद्र फडणविस यांनी कौतुकाची थाप देत या आश्वासक चेहऱ्यावर उज्वल भविष्याची मोहर उमटवली असल्याचे कौतुक सर्वत्र केले जात आहे.

या वेळी घोडावत ग्रुपचे संजय घोडावत,डी. वाय पाटील ग्रुपचे डॉ.संजय पाटील, कृष्णन ग्रुपचे कृष्णकुमार गोयल आदींसह विविध क्षेत्रात भरीव योगदान असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान या वेळी करण्यात आला.या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन नवभारत ग्रुपचे मॅनेजिंग एडिटर निमीश माहेश्र्वरी यांनी केले होते.

महाराष्ट्राच्या तरुण राजकीय नेत्यांच्या यादीत कोपरगावचे नाव अभिमानाने कोरले गेले आहे त्याबद्दल विचारले असता विवेकभैय्या कोल्हे यांनी हा पुरस्कार शेतकरी,युवक,हितचिंतक व्यापारी-उद्योजक आणि माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या प्रती समर्पित करतो अशी प्रतिक्रिया दिली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!