लोणी दि.१६ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अंतर्गत अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समिती व प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय, लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नुकत्याच संपन्न झालेल्या आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेमध्ये प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाला मुले व मुली या दोन्ही गटांमध्ये सांघिक उपविजेतेपद प्राप्त झाले.
मुलांच्या गटामध्ये नोमान पटेल, ऋषिकेश गुडघे, फरहान बागवान, रेहान बागवान, शुभम मुंगसे, दानिश शेख यांनी उत्कृष्ट कामगिरी करत मुलांच्या गटामध्ये प्रवरा ग्रामीण अभियंत्रिकी महाविद्यालयाला उपविजेते प्राप्त करून दिले तसेच मुलींच्या गटामध्ये अनुष्का पाटील, नंदिनी चौधरी, कल्याणी गाडेकर, ईश्वरी थोरात, ऐश्वर्या ठुंबळ यांनी उत्कृष्ट कामगिरी करत मुलींच्या गटांमध्ये प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाला उपविजेतेपद मिळवून दिले.
या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख संस्थेचे सहसचिव भारत घोगरे , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक प्राचार्य डॉ प्रदीप दिघे, क्रिडा संचालक डाॅ.प्रमोद विखे,आश्वीचे कॅम्पसचे डॉ राम पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ राजेंद्र देवकाते, माजी सचिव डॉ रोहित अदलिंग,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय गुल्हाने, रजिस्टर डॉ एल.बी अभंग, प्रा सुभाष देशमुख, प्रा विजय देशमुख,डॉ उत्तम अनाप, प्रा सीताराम वरकड, प्रा राहुल उबाळे,प्रा. बेंद्रे,माध्यमिक चे सुनील आहेर यांची उपस्थिती होती.
या स्पर्धेमध्ये एकूण दोनशे खेळाडूंचा सहभाग होता संस्थेचे क्रीडा संचालक डॉ प्रमोद विखे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय गुल्हाने,तंञनिकेतनचे प्राचार्य व्ही.आर.राठी यांच्या मार्गदर्शनाखाली टूर्नामेंट डायरेक्टर म्हणून महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ श्रीनिवास मोतीयेळे, तर चिफ आर्बिटर म्हणून यशवंत बापट,पंच म्हणून शैनेश आहेर,देवेंद्र ढोकळे,रोहित आडकर, तसेच स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रा. सागर महाजन, प्रा नितीन चव्हाण, शार्दूल गागरे,सतीश कोळगे यांनी काम पहिले.
स्पर्धेमध्ये सांघिक विजेतेपद संजीवनी महाविद्यालय कोपरगाव, सांघिक उपविजेतेपद प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी,मुली सांघिक विजेतेपद संजीवनी महाविद्यालय कोपरगाव सांघिक उपविजेतेपद प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी वैयक्तिक निकाल मुले
प्रज्वल आव्हाड – प्रथम, तन्मय महाजन द्वितीय, तेजस जगधने तृतीय आदेश देखने, वैयक्तिक निकाल मुली पूर्वा पोखरकर प्रथम सानिया पठाण द्वितीय पूर्वा भांदरी तृतीय यश संपादन केले.



