9.3 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

कोल्हार खुर्दमध्ये बसचे ब्रेक फेल; ड्रायव्हरच्या प्रसंगावधाननाने प्रवासी सुखरूप

कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा ) :- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे पंढरपूरहुन नाशिककडे जाणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखून बस एक बांधकाम चालू असलेल्या वाळूच्या ढिगावर घातल्याने प्रवाशांचे प्राण वाचले.
    

कोल्हार खुर्द येथे नगर मनमाड महामार्गावर पंढरपूर हुन नाशिकच्या दिशेने जात असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक MH 40 AQ 6373 हि प्रवाशांना घेऊन जात असताना कोल्हार खुर्द जवळ या बसचा ब्रेक फेल झाला.ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या (महादेव पांढरे , पंढरपूर डेपो) लक्षात आल्यानंतर त्याने बिरोबा मंदिराजवळ बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी बस घातली.तेथे असलेल्या वाळूच्या ढिगावर गाडी जाऊन पुढे असलेल्या बांधकामावर गाडीची धडक बसून गाडी थांबली गेली.
   
रविवारी संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते. धडक बसल्यानंतर प्रवासी काहीवेळ घाबरले. यामध्ये प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही फक्त एक महिला किरकोळ जखमी झाली होती.
   
प्रवाशांचे दैव बलवत्तर व चालकाचे प्रसंगावधान यामुळे प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचले कारण काही सेकंदावरच पुढे प्रवरा नदीचा पूल होता जर या चालकाने प्रसंगावधान दाखवले नसते तर गाडी प्रवरा नदीकडे जाण्याची शक्यता होती.. त्यामुळे चालकाच्या या हुशारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.  
  
एक किलोमीटर मागेच ही बसचे ब्रेक फेल झाल्याचे या चालकाच्या लक्षात आल्यानंतर गाडी थांबवण्यासाठी तो जागा शोधत त्याने गाडी नियंत्रणात आणत समोर वाळूचा ढीग दिसल्यावर तेथे गाडी घातल्याचे संबंधित चालकाने सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!