नेवासा ( जनता आवाज वृत्तसेवा):- आमदार शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतून नेवासा शहरात यापुढे प्रत्येक महिन्याच्या अठरा तारखेला मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळाचे वतीने देण्यात आली आहे.
माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या संकल्पनेतून आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळ, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व बुधराणी हॉस्पिटल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासे शहर व तालुक्याच्या ग्रामीण भागातील गरीब, निराधार व ज्येष्ठ नागरिकांच्या नेत्र आरोग्यासाठी नवसंजीवनी ठरणारे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्रक्रिया शिबिराचे नेवासा येथील खोलेश्वर गणपती मंदिराचे पाठीमागे असलेल्या ज्ञानदीप इंग्लिश स्कुल येथे प्रत्येक महिन्याच्या अठरा तारखेला होणार आहे.
यावेळी बुधराणी हॉस्पिटलची नेत्र तज्ञ टीम नेत्र रुग्णांच्या तपासणी करून मोतीबिंदू असल्यास त्यावर संबंधित रुग्णांना पुणे येथे घेऊन जात मोतीबिंदू शस्रक्रिया करणार आहेत. दरम्यान, दोन दिवसानंतर संबंधित रुग्णांना पुन्हा नेवासा येथे शिबिरस्थळी आणून सोडण्यात येणार आहे. मोतीबिंदू शस्रक्रियासाठी निवड झालेल्या रुग्णांनी येतांना आधारकार्ड, रेशनकार्ड झेरॉक्स व दोन पासपोर्ट फोटो बरोबर घेऊन येणे अनिवार्य आहे. रुग्णांनी किंवा त्यांच्या
नातेवाईकांनी रुग्णांचे नाव नोंदणीसाठी शिबिराचे समन्वयक प्रा. सुनील गर्जे- ९८२२८१२६२६, राजेंद्र लोखंडे-९८८१११६०६०, दत्तात्रय गडाख- ९८२२५१६५२२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजक आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळाचे वतीने करण्यात आले आहे.
८२ रुग्णांवर यशस्वी शास्रक्रिया आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळातर्फे २० ऑगस्ट रोजी नेवासे येथे झालेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात एकूण ४२४ नेत्र रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या पैकी १२५ नेत्र रुग्णांचे रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी निवड करण्यात आली होती. पैकी ८२ नेत्र रुग्णांवर पुणे येथील बुधरानी हॉस्पिटल येथे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांना नव्याने दृष्टी मिळाली.
आ. गडाखांची दूरदृष्टी म्हणून पाहू शकलो सृष्टी”मोतीबिंदू असूनही नेत्र आजाराकडे करत असलेले दुर्लक्ष, उपचारासाठी लागणारा मोठा खर्च, यामुळे आम्ही उपचार व शस्रक्रियेसाठी टाळाटाळ करत होतो. मात्र, आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करून नेवासा शहरासह तालुक्यात जनजागृती केली यामुळे आम्ही या शिबिराचा लाभ घेऊन घेतला दरम्यान शस्त्रक्रिया नंतर आम्हाला सृष्टीचा आनंद घेता आला हे केवळ गडाख यांच्या दृष्टिकोनातूनच. अशा प्रतिक्रिया यशस्वी मोतीबिंदू शस्रक्रिया झालेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी दिल्या.



