कोपरगांव( जनता आवाज वृत्तसेवा ):- ‘रोटरी क्लब हा जगभरात २०० देशांमध्ये ३६००० क्लबच्या माध्यमातुन सामाजिक, शैक्षणिक व आरेग्याच्या संदर्भात कार्य करीत आहे. रोटरी क्लब मार्फत जगभरात केलेल्या पोलिओ निर्मुलनाचे कार्य उल्लेखनिय आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातुन युथ एक्सचेंज उपक्रमा अंतर्गत आपल्या विध्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठीच्या संधी आहेत. तेथे रोटरी सदस्याच्या घरीच त्या कुटूंबाचा सदस्य म्हणुन विध्यार्थी राहतो. तसेच परदेशातील विध्यार्थीही आपल्याकडे येवुन राहु शकतात. अशा प्रकारे रोटरी क्लबचे कार्य जगात आदर्शवत आहे’, असे प्रतिपादन ९ जिल्ह्याातील ८४ क्लबच्या (रोटरी डिस्ट्रिक्ट क्रमांक ३१३२) प्रांतपाल रोटरीयन स्वातीजी हेरकळ यांनी केले.
संजीवनी काॅलेज ऑफ आयुर्वेदा अँड रिसर्चच्या भव्य सभागृहामध्ये रोटरी क्लब ऑफ कोपरगांव सेंट्रलच्या वतीने रोटरी क्लब असेंब्ली आयोजीत करण्यात आली होती. या कार्यक्रमात श्रीमती हेरकळ बोलत होत्या. सदर प्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी प्रमोद शिंदे (सातारा), दि रोटरी फाऊंडेशन डायरेक्टर सीए नि




