कोपरगाव ( जनता आवाज वृत्तसेवा ):कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथे सालाबादप्रमाणे ऋषीपंचमीनिमित्त प्रख्यात किर्तनकार ह. भ. प. मीराबाई मिरीकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम बुधवार दि. २० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९ वाजता श्री शनी महाराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला असून या किर्तन श्रवणाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संवत्सर ग्रामस्थांनी केले.
प. पू. रामदासी महाराज यांच्या प्रेरणेने आणि स्व. नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झालेल्या या किर्तनाची परंपरा संवत्सर या गांवी आजही अव्याहतपणे सुरु आहे. विशेष म्हणजे ह. भ. प. मीराबाई मिरीकर या अखंडपणे दरवर्षी आपली किर्तन सेवा देतात. संवत्सर या गांवाला पौराणिक व धार्मिक महत्व असल्याने ऋषीपंचमीच्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिला संवत्सर येथे गोदावरी नदीमध्ये स्नानाची पर्वणी साधण्यासाठी येत असतात. लाखो महिलांच्या उपस्थितीने गोदाकाठाला अक्षरशः पंढरपुराचे स्वरूप येते. पुरातन काळात राजा दशरथाने श्रीरामाच्या जन्माच्यावेळी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी ज्या शृंगऋषी




