राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- राहुरी येथील केशरनगर मधील केशर गणेश मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीची स्थापना राहुरीचे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी मा. ज्ञानेश्वर ठोंबरे साहेब व त्यांच्या सौ. गायत्री ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आली.
सालाबाद प्रमाणे या ही वर्षी केशर गणेश मित्र मंडळाच्या गणेश ची स्थापना करण्यात आली असून यावर्षी भरपूर मनोरंजनाचे कार्यक्रम मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे तर या वेळेस मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण भोसले उपाध्यक्ष सुनील भुजाडी सचिव संतोष मुंडलिक खजिनदार कारभारी सांगळे तसेच माने, ढोकणे राठोड, पानसंबळ देडगे, डावखर उदावंत, कल्हापुरे आडसुरे,पत्रकार राजेंद्र म्हसे तसेच महिला वर्ग आणि केशरनगर वाशीय मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



