spot_img
spot_img

हरेगाव प्रकरणातील फरार आरोपी नाना गलांडे याला अटक करा या मागणीसाठी भीमशक्तीचा रस्ता रोको आंदोलन

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा ):-हरेगाव मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधार व फरार आरोपी नाना गलांडे याला अटक करा या मागणीसाठी भीमशक्ती संघटनेच्या वतीने व जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांचे नेतृत्वाखाली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा समोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले 

यावेळी संदीप मगर म्हणाली की हरेगाव मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी नाना गलांडे हा वीस ते पंचवीस दिवसापासून फरार आहे याला आतापर्यंत अटक का झाली नाही जर सहा आरोपी जर दोन दिवसात पकडतात मग नाना गलांडे याला पोलिस पाठीशी घालत आहे का? असा प्रश्न समाजाला आम्हाला पडला आहे का कारण तो पुण्यावरून अटकपूर्व साठी वकील पत्रांवर सह्या करून जातो तरी पोलिसांना त्याचा ताग पत्ता लागत नाही जर नाना गलांडे याला जर अटकपूर्व जामीन झाला तर तो पीडित कुटुंबावर दबाव आणू शकतो फिर्यादीवर दबाव आणू शकतो त्याची हरेगाव मध्ये दहशत आहे त्याने अनेकांच्या जमिनी बळकवल्या  आहेत त्यामुळे आपण याला लवकरात लवकर अटक करून मोका अंतर्गत कारवाई करावी, तसेच ती केस फास्टट्रॅक कोर्टात चालवावी, विशेष सरकारी वकील देण्यात यावा ,पीडित कुटुंबाला आपण संरक्षण द्यावे, या मागणीचे निवेदन तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना यावेळी देण्यात आले यावेळी भीमशक्ती उफजिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड युवा उपजिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे महिला अध्यक्ष शोभाताई पातारे उप महिला जिल्हाध्यक्ष विजयाताई बारसे भीमशक्ती तालुकाध्यक्ष संदीप अमोलिक युवा तालुकाध्यक्ष तनवीर सय्यद सागर पठारे शहराध्यक्ष अंबादास निकाळजे उपअध्यक्ष अरुण खडीझोड महिला तालुकाध्यक्ष कल्पना तेलोरे महिला शहराध्यक्ष वंदना गायकवाड महिला शहर उपाध्यक्ष जयश्री पवार चंद्रकांत येवले अनिल गांगोडे सुरज गायकवाड प्रशांत भोसले बापू विधाटे संदीप कसबे यासीन सय्यद मुसा शेख बबन आहेर प्रमोद जाधव कार्तिक आहेर अनिकेत सगळे सोमनाथ पटाईत अनिल वाहुळ संतोष मगर राजू ऐडके कुणाल वाहुळ तुषार पारधे सुरज गायकवाड सुदाम गायकवाड सतीश गायकवाड विश्वनाथ नरोडे अनिल गांगुर्डे गोरख टायर योगेश बर्डे सुनील बर्डे प्रमोद जाधव सचिन खांडरे गुड्डू पंडित कार्तिक आहेर आनद पठारे ऋतिक पाईक आरपीआयचे राजू मगर संजु बोरगे विशाल सुरडकर संदीप वाघमारे बाबा पंडित शालिनीताई मगर सुनीता भाकरे रेखा बोर्डे अर्चना दुशिंग शोभा भालेराव कांता कदम केसरबाई जावळे रंजना हुसेळे सुशीला कसबे नंदा खरात सुशीला कटर नवरे अनेक महिला व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भिमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी फरार आरोपी नाना गलांडे याला जरा लवकर अटक झाली नाही तर लवकरच त्याला अटक करा या मागणीसाठी भव्य मोर्चा काढणार असा इशारा यावेळी पोलीस प्रशासनाला दिला.

यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता व आरोपी नाना गलांडे यांना अटक करा इतर मागण्यासाठी प्रदीप थोरात यांनी सात दिवसापासून आमरण उपोषण चालू होते ते उपोषण आज भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्यामध्यस्थी नंतर सोडण्यात आले व त्यांना पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी आरोपीला लवकर अटक करू तुमच्या सर्व मागण्या मान्य करू असे लेखी आश्वासन दिले

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!