वैजापूर(जनताआवाज वृत्तसेवा):- वैजापूर तालुक्यातील पारळा येथील गावठी दारूच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी छापा टाकून एकास ताब्यात घेतले.त्याच्या ताब्यातून दोन हजार रुपये किंमतीची २० लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली आहे.
वैजापूर तालुक्यातील पारळा येथील गावठी दारूच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई
शिवूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गावठी दारू विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.त्या आधारे पारळा येथे छापा मारुन ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार संजय घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संभाजी दिनकर मोरे याच्या विरुद्ध शिवूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक फौजदार आर आर जाधव हे करीत आहेत.



