8.7 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

जिनको शक था हमारी काबिलियत पर,आज उन सबको गवाह बन दिया। खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या भाषणाने नवीन संसद दणाणली

दिल्ली ( जनता आवाज वृत्तसेवा ):-वाकिब कहा जमाना हमारी उड़ान से, वो और थे जो गए आसमान से ।रखकर चांद पर कदम आज हमने इतिहास बना दिया, जिनको शक था हमारी काबिलियत पर, आज उन सबको गवाह बना दिया। या काव्य पंक्तीने अहमदनगरचे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी नवीन संसद भवनात आपल्या निवेदनाला सुरुवात करून चांद्रयान -३ मोहीम यशस्वी झाल्या बद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण वैज्ञानिकांचे त्यांनी अभिनंदन केले. या मोहिमेत १०० महिला वैज्ञानिक ह्या होत्या या सर्व महिलांचे त्यांनी विशेष कौतुक करत नारिशक्तीचे प्रतिक म्हणून देखील चांद्रयान ३ मोहिमेकडे पाहिले जाईल असेही यावेळी त्यांनी सांगितले.

सतराव्या लोकसभेच्या विशेष अधिवेशनात नवीन संसद भवनात चांद्रयान ३ मोहीम यशस्वीते बद्दल आयोजित विशेष चर्चेत सहभाग घेत खा. विखे यांनी आपल्या दहा मिनिटाच्या निवेदनात सर्वांना मंत्रमुग्ध केले.

विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की लहानपणी आम्ही नेहमी ऐकलेली कविता “चंदामामा दूर के पुए पकाए पुरके,

आप खाए थाली में मुन्ने को दे प्याली में” अगदी विरोधकांचे देश स्वातंत्र झाल्या पासून आतागायत तसेच आहे. स्वतः चांदीच्या ताटात खाल्ले मात्र गरिबाला साधे पाणी पण दिले नाही. मात्र पंतप्रधान मोदी यांनी गरिबांच्या घरा पर्यंत पाणी पोहचविले . चांद्रयान २ अयशस्वी झाल्यावर इस्रो चे संचालक हे खूप नाराज झाले होते मात्र नरेंद्र मोदी यांनी त्यांना त्यावेळी नुसता धीर दिला नाही तर त्यांना पुन्हा नव्या जोमाने चांद्रयान ३ मोहीम करण्यास भाग पाडले, आणि आपण जाणतोच की ही मोहीम जगात सर्वात यशस्वी करणारा आपला भारत देश हा पहिला ठरला. या यशस्वी मोहीम बद्दल त्यांनी काव्यपंक्ती तून मांडताना ते म्हणाले की “ये चांद तेरी जिद के आगे क्या मैं नतमस्तक हो जाऊंगा,

तू ख्वाब बड़े रख दे अपने, मैं फिरसे वापस आजावूंगा।

तू दूर है भले ही मुझसे ,पर पास कभी तो आयूंगा।

है प्रेम अमर मेरा तुझसे,मैं उसको छोड़ना पावूंगा।

उस बार जिद चलेगी मेरी ,उसको याद दिलाऊंगा।

तू ख्वाब बड़े रख दे अपने, मैं फिरसे वापस आवूंगा, मैं फिरसे वापस आवूंगा। 

१४जुलै २०२३ ही तारीख भारतीयांसाठी अजरामर अशीच असून या तारखेस चांद्रयान ३ मोहीम आपण सर्वांनी अनुभवली तशीच स्वातंत्र्या पूर्वी क्विट इंडिया मोहीम मुळे आपल्या सर्वांच्या लक्षात ती आहे मात्र येणारी १४जुलै २०२४ ही तारीख देखील क्विट इंडिया अलायन्स अशी भारताची जनता करून दाखवेल आणि देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी जी हे विराजमान झालेले असतील. भारतात वैज्ञानिक आता सूर्याच्या दिशेने पावले टाकत आहे अर्थात सन मिशन मात्र विरोधक हे देखील तिसऱ्यांदा सन लॉंच करत आहे.परंतु आपल्या सगळ्यांना हे माहीत आहे भारत सन मिशन पूर्ण करेल आणि विरोधक पुन्हा एकदा तोंडावर पडतील. देश आज महासत्ता होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आधी जय जवान जय किसान होते नंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी जय जवान जय किसान जय विज्ञान आणले त्यानंतर मोदीजी यांनी याला जोडूनच जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय अनुसंधान आणले. त्यामुळे देशाची सर्व बाबतीत आगेकूच होत असून आपण अंतराळ सुद्धा हळू हळू काबीज करत आहोत असे सांगताना त्यांनी एक शेरच्या माध्यमातून म्हणाले की “अंतरिक्ष में गूंज उठे चंद्रयान का गान, चांद तिरंगा रंग में रंगने लगा नई एक पहचान लिए।

मेरे भारत के वैज्ञानिक तुम गौरव हो भारत का, ऊंचा माथा लिए खड़े हम सच्चा एक अभिमान लिए।  

खा.डॉ.सुजय विखे यांच्या या काव्यपंक्ती तसेच शेरोशायरी पूर्ण निवेदनाने संसद भवन दणाणून गेले होते. त्यांच्या या निवेदनाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याप्रसंगी कौतुक केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!