spot_img
spot_img

उद्बोधन वर्गातून मिळते शिक्षणाला नवी दिशा- डाॅ.प्रदिप दिघे गृहविज्ञान महिला महाविद्यालयात उद्बोधन कार्यक्रम

लोणी दि.२७ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रवरेच्या माध्यमातून शिक्षणांसोबतचं बदलत्या जगाची माहीती मुलांनादिली
जाते.शिक्षणांबरोबरचं करीअरसाठी प्रवरा शैक्षणिक संकुल कायम आपल्या सोबत आहे.शिक्षणांतून आपले स्वप्न पुर्ण करा असे प्रतिपादन साविञीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि संस्थेचे अतांञिक विभागाचे प्राचार्य डाॅ.प्रदिप दिघे यांनी केले.
     

लोणीच्या लोकनेते बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या गृहविज्ञान व संगणक महिला महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीसाठी उद्बोधन कार्यक्रमात डाॅ.दिघे बोलत होते. युजीसीच्या नियमानुसार घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयाची ओळख प्राचार्या डाॅ.अनुश्री खैरे करुन देतांना महाविद्यालय आणि विविध उपक्रमाची माहीती देतांनाच प्रवरेच्या शैक्षणिक वाटचालीची माहीती दिली.
 
यावेळी प्रवरा अभिमत विद्यापीठ लोणी येथील प्रसूतिशास्त्रज्ञ डाॅ.विद्याधर बंगाळ यांचे किशोरवयीन मुलींची आरोग्य विषयक काळजी, डॉ. लक्ष्मण घायवट यांचे इथिक्स आणि मोरलीटी , प्रा. संदीप लोखंडे यांचे मनाची शक्ती आणि डॉ मंगेश वाघमारे यांनी अहमदनगरची उद्योजगता, सौ रुपाली लोंढे यांचे स्त्री सक्षमीकरण आणि बचत गटाची भूमिका आदी विषयांवर व्याख्याने झाली.
उद्बोधन कार्यक्रमात बांधणी रंगकाम या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. तसेच फुलांपासून बनविण्यात येणाऱ्या प्रवरा अगरबत्ती उद्योगास भेट देण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन प्रा जया डबरासे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. राजश्री तांबे, गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ कांचन देशमुख, बीसीए विभाग प्रमुख प्रा. संजय वाणी आदींनी परिश्रम घेतले.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!