श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- बेलापूर-उक्कलगाव रोडवर एकलहरे शिवारात नईम रशीद पठाण या बॅटरी व्यवसायिक करणाऱ्या तरुणाचा दरोड्यात खून झाल्याचा बनाव करून पत्नीने पतीला झोपेच्या गोळ्या देऊन त्याचा गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. बुशरा नईम पठाण, वय २७ असे आरोपी पत्नीचे नाव आहे.
बेलापूर येथील बॅटरी व्यवसायिक नईम रशीद पठाण यांच्या घरावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी सात लाख रुपये लुटून नेतानाच नईम पठाण यांचा खून केला. नईम यांच्या पत्नीलाही जबर मारहाण करण्यात आली असून त्या गंभीर जखमी आहेत. दरोडेखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश होता, अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र दरोडेखोर आले याचा कुठलाही ठोस पुरावा पोलिसांना मिळाला नाही. त्या शिवाय एवढ्या रात्री बुशराने बंगल्याचा दरवाजा का उघडला? याचा संशय पोलिसांना आला. मंग त्या अनुषंघाने पोलिसांनी तपास करण्यात सुरवात केली. नाईन चा मृतदेह बेडवर होता.व तेथे कुठलीही झटापट झाल्याची चिन्हे नव्हती. आणि त्याच्या पँटच्या खिशात चाळीस हजार रुपये ही तसेच होते. दरोडेखोरांनी सात लाख रुपये लुटून नेले. मग त्याच्या खिशातील चाळीस हजार रुपये का नेले नाही? असाही प्रश्न पडला पोलिसांना पडला मग श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. नातेवाईकांची चौकशी केली. नईम ची पत्नी बुशरा हीची तिची ननंद नसीम मुजफ्फर शेख यांच्या समक्ष चौकशी केली. त्यावेळी तिने दरोड्याचा बनाव करून आपणच खून केल्याची कबुली दिली.
पती नईम हा अनैसर्गिक कृत्य करून तिचा छळ करत असे. त्यामुळे तिने त्याला दुधातून झोपेच्या गोळ्या देऊन नंतर खिडकीला साडी बांधून त्याच्या साह्याने गळा वळल्याची कबुली तिने दिली.
पोलिसांनी आज सकाळी तिला ताब्यात घेतले आहे. या रहस्यमय गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्यासह सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळीक, हवालदार मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, पोलीस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, रवींद्र कर्डिले, सागर ससाने, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, चालक गावडे, महिला पोलीस सरग यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
आरोपींचा शोध लागत नाही तोवर अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका देखील नईमच्या नातेवाईकांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर एका रात्रीत गुन्ह्यांचा तपास करून पोलिसांनी गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे.