29.8 C
New York
Saturday, September 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

गांधी जयंती दिवशी १८२ गावातील निळवंडे लाभार्थी शेतकऱ्यांची उपोषण 

राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ):-2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी तांभेरे येथे श्रीराम मंदिर समोर १८२ गावातील निळवंडे लाभधारक शेतकरी यांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती दादासाहेब पवार यांनी दिली.

दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटलें आहे की निलवंडे उजवा व डाव्या कालव्याची कामे तात्काळ पूर्ण करून लाभधारक शेतकऱ्यांना शेतात पाणी द्यावे. प्रस्तावित कालव्यांच्या मध्ये येणाऱ्या अडचणी (वनविभाग) व इतर विभागांच्या मंजुरी शासनाने आपल्या स्तरावर सोडवणे.

डाव्या आणि उजव्या कालव्या वरील पुच्छ कालवे ओपन स्वरूपाचेच व्हावेत दिनांक 24/ 2/ 2022. रोजी दिलेला कार्यारंभ आदेश रद्द करण्यात यावा. बंद पाईप कालवे रद्द करण्यात यावे. निळवंडे धरणावर 182 गावांचे पिण्याचे पाणी आरक्षण करावे. चारी व पोट चारी याही ओपन पद्धतीनेच करण्यात याव्या. दिनांक 17/ 1 /2020 .च्या कार्यकारी अभियंता यांच्या पत्रान्वये कालव्यांची कामे सन 2022 -23  पर्यंत पूर्ण करून सिंचन क्षमता निर्मिती करण्यात येत आहे असे लेखी आश्वासन देण्यात आले होते परंतु आजतागायत कोणतीच कारवाई झालेली नाही यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे त्यामुळे या दोषी असणाऱ्या वर कायदेशीर कारवाई व्हावी.

गेल्या अनेक वर्षापासून चातकाप्रमाणे वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली गेली आहे लोकप्रतिनिधी च्या दुटप्पी भूमिकेमुळे निळवंडे डाव्या कालव्याची चाचणी घेण्यात आली व निळवंडे च्या उजव्या कालव्याची कामे जाणीवपूर्वक रखडवली आहेत यामागील राजकारण शेतकरी जाणत आहेत ते या दुराग्रही वागणुकी बाबत अनभिज्ञ नाहीत.वेळोवेळी अनेक वर्षापासून अनेक सामाजिक संघटना सामाजिक कार्यकर्ते यांनी निळवंडे साठी विविध प्रकारची आंदोलने उपोषणे रास्ता रोको केलेली आहेत त्या सर्वांचा एकच ध्यास होता आहे तो म्हणजे निळवंडे चे पाणी शेतात येईल व बळीराजा सुखावेल.परंतु नियतीचा खेळ वेगळाच खेळ खेळत होती मागील काही वर्षात निधीची उपलब्धता मोठ्या प्रमाणात होती कामे जोशाने सुरू झाली होती परंतु मधील कालावधीत राज्य सरकार बदलले आणि निळवंडे कालव्यांच्या कामाला ग्रहण लागले नवीन मंत्री आले आणि कालव्यांच्या कामाची गती मंदावली. यामध्ये कालव्यांची कामे रखडवण्यासाठीच नवीन नियम लागू केले त्यात कालव्यांच्या कामासाठी लागणारी गौण खनिजे वाळू खडी साहित्यसामग्री बंद झाली मग काय याचा फायदा राज्य सरकारमधील असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी (मंत्री)राजकीय फायदा घेण्याचे ठरवले काहीही झाले तरी डाव्या कालव्याची कामे (अपूर्ण का होईना) परंतु पूर्ण दाखवून कळ आपल्याच (काळात)हाताने दाबायची असा जोर धरला

लोकप्रतिनिधी विसरले असावेत त्यामुळे असे किती दिवस या निळवंडे च्या पाण्यासाठी आंदोलने उपोषणे, रास्ता रोको करायचे परंतु आता एकच ध्येय हाती घेत आहोत आणि शेवटचीच लढाई लोकशाही मार्गाने करायचे आहे सर्व मागण्या मान्य होईपर्यंत व शासनाकडून ठराविक कालावधीमध्ये आम्हास शेतीमध्ये पाणी उपलब्ध करून देणार असे लेखी आणि त्यावर चालू असलेले कामाची परिस्थिती बघूनच उपोषणाची दिशा ठरवण्यात येणार आहे अन्यथा निकराची लढाई करण्यात येणार आहे यामध्ये निळवंडे लाभधारक १८२  गावे त्यातील सर्व शेतकरी भाग घेणार आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!