श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):-श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वाडगाव येथील बहुचर्चित संतोष पवार खून प्रकरणातील आरोपी मयताची पत्नी सविता पवारचा जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे. यांचे वकील अॅड अरुण जंजिरे यांचा युक्तिवाद ग्राहय धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर.यादव यांनी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जात | मुचलक्यावर काही अटींच्या अधीन जमीन मंजूर केला आहे.
दि. ५ एप्रिल २०२३ | रोजी निपाणी वडगाव येथील संतोष पवार यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यविधीची | तयारी सुरू असताना श्रीरामपूर पोलीस | स्टेशनला फोन आला.
पवार यांचा मृत्यू संशयास्पद असून खून झाल्याची शंका त्यांनी व्यक्त केली. पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवडे यांच्या पथकाने तात्काळ निपाणी वडगाव येथे पोहोचून पवार यांचा अंत्यविधी थांबवला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतला.
खून झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चौकशीअंती या प्रकरणी खुनाचा गुन्हा मयताचे अनैसर्गिक मृत्यू दाखल झाला. या गुन्हयात पवार याची पत्नी सविता अजय गायकवाड, प्रसाद भवार आणि सोपान राऊत यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. शुक्रवार दि १५ सप्टेंबर रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. यादव यांच्या समोर
सविता पवार यांचा जामीनसाठी अर्ज ठेवण्यात आला होता. आरोपी महिलेच्या वतीने अॅड. अरुण जंजिरे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले की प्रथमदर्शी सक्षम पुरावे नाहीत. मयताची गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही तपासी अधिकाऱ्याने ती तपासली नाही, फोरेन्सिक अहवालातील त्रुटी सिद्ध करण्यास असक्षम असल्याने जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद केला.
अँड जंजिरे यांचा | युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. यादव यांनी सविता पवार यांचा जामीन मंजूर केला.