spot_img
spot_img

अमृत कलश यात्रेला देहरे येथे कृषी कन्यांनी केला प्रारंभ

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा):-नगर तालुक्यातील देहरे या गावात अमृत कलश हा कार्यक्रम उत्साहात पार पाडला .गावातील माती कलशात एकत्रित करण्याचे आव्हान  कृषी कन्यांनी केले हा अमृत कलश 30 सप्टेंबर पर्यंत अहमदनगर शहरात फिरणार असून या कलशायामध्ये जमा झालेली माती व तांदूळ २७ ऑक्टोबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे पाठवण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय देहरे च्या प्रांगणात हा कार्यक्रम आज दि २० रोजी सकाळी पार पडला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अब्दुल खान हे होते, यावेळी युवा नेते महेश काळे यांनी देहरे ग्रामस्थांच्या वतीने मनोगत व्यक्त करून विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले आणि या कलश यात्रेला शुभेच्छा दिल्या, 

मा प्रा सुहास जी पाखरे सर यांनी मोलाचे असे मार्गदर्शन करून आपले मनोगत व्यक्त केले, विद्यार्थी यांना स्टेज डेएअरींग कशी वाढवायची याबद्दल मार्गद्शन केले,सूत्र संचालन कृषी कन्या मैथिली सुर्यवंशी हीने केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राध्यापक यांनी केले, माजी सैनिक ईश्वर काळे यांनी देखील विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या,

देहेरे येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ सलंग्नित डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचालित कृषि महाविद्यालय विळदघाट येथील कृषीकन्या कु. लांबे पुजा सूर्यभान, कु. तांबे भैरवी भानुदास, कु . लष्करे प्रथमेशवरी संतोष, मोहिते शुभदा, सूर्यवंशी मैथिली या काही दिवसापासून विविध उपक्रम राबवत असतात, त्याबद्दल सर्वत्र त्याच अभिंनंदन होत आहे,

या कार्यक्रमास सरपंच नंदा संतोष भगत, उपसरपंच दिपक नाना जाधव, युवा नेते महेश काळे, अमोल काळे,

माजी सरपंच अब्दुल खान, माजी सरपंच किसन धनवटे , माजी सैनिक ईश्वर काळे, ग्रामपंचायत सदस्य रमेश काळे, किरण लांडगे, करंडे प्रविण ,दिपक बेर्डे नवभारत विद्यालयाचे लष्करे सर, बर्डे सर, व विद्यलयचा सर्व स्टाफ व विदयार्थी आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते,

कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे प्रा. के. एस. दांगडे , पी.सी .ठोंबरे, डी.पी. मावळे, रोंगे मॅडम ,एम .ए.खेडेकर सर ,प्राचार्य डॉ. एम. बी . धोंडे, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. बी.राऊत, हे उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!