श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ योजने अंतर्गत जिल्हा नियोजन समितीमार्फत श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील प्रमुख चार रस्त्यांसाठी दीड कोटी तसेच जिल्हा परिषदेमार्फत विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत चार रस्त्यांसाठी दोन कोटी अश एकूण साडे तीन कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीकडून सन २०२३-२४ या आर्थिक वार्ह्साक्रिता लेखाशीर्ष ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण ३०५४ या योजनेतून श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील टाकळीभान ते कमालपुर (ग्रामा ३६) रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी ३९ लाख ९९ हजार ९८ रुपये, दत्तनगर येथील दत्तनगर ते गोंधवणी (ग्रामा १५) रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी ३९ लाख ९९ हजार ६२० रुपये, मातुलठाण येथील पुणतांबा श्रीरामपूर ते मातुलठाण (ग्रामा १३९) रस्ता मजबुतीकरण कामासाठी २४ लाख ९९ हजार ९२१ रुपये तर हरेगाव येथील रा.मा. ५१ ते हरेगाव उंदीरगाव ते मुठेवाडगाव (ग्रामा १२०) रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामासाठी ४४ लाख ९९ हजार ८४२ रुपये अशा १ कोटी ४९ लाख ५२२ रुपये खर्चाच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
तसेच जिल्हा परिषदेच्या लेखाशीर्ष ३०५४ या योजनेतून विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत दोन कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. रा. मा. ५० ते बेलापूर ते अशोकनगर रस्त्यासाठी ७५ लाख रुपये, बेलापूर ते दिघी रस्त्यासाठी ६० लाख रुपये, नाऊर ते खैरी रस्त्यासाठी ४० लाख रुपये तसेच प्रजिमा-६ ते भोकर वडजई रस्त्यासाठी २५ लाख रुपये अशा एकूण दोन कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली असल्याचे आ. कानडे यांनी सांगितले.
श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील श्रीरामपूरसह राहुरी तालुक्यातील ३२ गावातील रस्त्यांच्या कामासाठी आतापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी आणला आहे. आतापर्यंत ९५ टक्के प्रमुख रस्त्यांची कामे झाली असून आता आणखी साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने तालुक्यातील रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने मजबूत होणार असल्याचे आ. कानडे यांनी स्पष्ट केले.




