4.2 C
New York
Saturday, November 30, 2024

Buy now

spot_img
spot_img

स्मशानभूमीचा केला कायापालट मा. ॲड सुभाष पाटील यांच्या प्रयत्नाने.

राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा):- जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती ॲड. सुभाषराव पाटील यांच्या प्रेरणा व संकल्पनेतून तालुक्यातील वांबोरी गावच्या स्मशानभूमीचा अत्यंत दिमागदार कायापालट झाला असून वांबोरी स्मशानभूमीच्या कामाची व कार्याची जिल्ह्यातील मोठ्या लोकसंख्येच्या गावांनी आदर्श घेऊन भविष्यात वांबोरी सारखी स्मशानभूमी सुषिभित करून नवा आदर्श निर्माण करण्याची गरज आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की वांबोरी गावाला ब्रिटिश काळापासून महत्त्व आहे वांबोरी स्मशानभूमीची जागा ज्या ठिकाणी आहे तेथे अनेक समाधी आहेत त्याचप्रमाणे त्या ठिकाणी महादेवाची पुरातन मंदिरे व ४० बाय ४० मीटर एवढ्या मोठ्या आकाराची जुनी बारव आहे तिला शिलालेख आहे मात्र कळत नाही म्हणजेच हे पुरातन काळातील वाल्मीक तीर्थक्षेत्र असल्याने या स्मशानभूमीच्या माध्यमातून यासाठी वाल्मीक तीर्थाचे रूपच पालटले असे म्हणणे वावगे ठरणार नाही आणि हे रूप पालटण्यासाठी ॲड सुभाषराव पाटील यांनी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या प्रकारचा निधी आणून हे सुशोभीकरण करण्याचा ध्यास घेतला व या सुशोभीकरणास अखेर त्यांना यश आल्याने वांबोरी गावासह पंचक्रोशीतील जनतेत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत ॲड पाटील यांनी लोक स्वातंत्र्याची बोलताना सांगितले की पूर्वी वांबुरी येथे मुळशी पार्टी होती तिचे रूपांतर ग्रामपंचायत मध्ये झाले सन १९७८ पूर्वी जागा दिसेल त्या ठिकाणी अंत्यविधी केला जात होता तर अंत्यविधी व दशक्रिया विधी देखील येथील बारवाच्या बुडाच्या दंडावर केला जात होता.

मी जेव्हा १९७८ साली सरपंच झालो त्यानंतर अंत्यविधी व दशक्रिया विधीसाठी या ठिकाणी जागा स्वच्छ करून अंत्यविधीसाठी स्मशानभूमीसाठी शेड केली पूर्वी ओट्यावरच अंत्यसंस्कार केले जात होते. एकाच वेळी तीन अंत्यविधी होतील असे शेड करून पिंजरे लावले अहमदनगरचे माजी नगराध्यक्ष नवनीत भाई बार्शीकर यांनी नगर येथे अतिशय सुशीभित अशी अमरधाम बांधले ते खूप नावाजले हे मी स्वतः बघितले होते असेच वांबोरी ते आपण करावे अशी माझी इच्छा होती नंतर मी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा सभापती झालो त्यावेळी मला जिल्ह्यातील अनेक स्मशानभूमी बघायला मिळाल्या त्यामुळे नगर सारखी स्मशानभूमी वांबोरीत करण्याचा मी निर्णय घेतला होता कारण माणूस जेव्हा मृत्यू पावतो तेव्हा त्याला कुठे नेले जाते कुठे पुरले जाते आणि कुठे जाळले जाते हे त्याला कळत नसतं प्रत्येकाचं कुटुंब मागील परंपरा पुढे चालू ठेवत असतात आज वांबोरी स्मशानभूमीत आम्ही पूर्वी झाडे लावली होती ती झाडे खूप मोठी झाली आहेत आता या झाडांमुळे तेथे ऊन सुद्धा लागत नाही या स्मशानभूमीचे काम करताना त्या वेळचे ग्रामसेवक नारायण मोठे यांचे मला चांगली साथ लाभली

या सुशोभीकरणासाठी भारत सरकारच्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषदेच्या वित्त आयोगाचे निधी पंचायत समितीचा निधी या निधीचे प्लॅनिंगच्या माध्यमातून येथे हा निधी वापरला व सुशिकरण केले आहे या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेण्याबरोबरच कंपाऊंड पेवर ब्लॉक टाकून परिसर ९०% पर्यंत सुशोभीत केला आहे असेही यावेळी पाटील यांनी सांगितले पुढे बोलताना त्यांनी सांगितले की खासदार डॉक्टर सुजय विखे यांनीही या कामी नऊ लाख रुपयाचा निधी देऊन सोशलभीकरणास मदत केली येथील पुरातन बारवास दुरुस्ती करून पडलेली दगडे व्यवस्थित बसून त्याला रंगरंगोटी केली आहे या ठिकाणी एक कर एवढी जागा असून दशक्रिया विधीच्या वेळी कीर्तन व प्रवचन करण्यासाठी आम्ही खाजगी माध्यमातून उठा बांधला आहे

त्यामुळे जुन्या बारवाचं रुपडं सुचेवित करण्यात आम्हाला यश मिळालं वाल्मीक तीर्थाचे यामुळे सुशोभीकरण झाल्याचा सार्थ आनंद आहे या स्मशानभूमीचं वैशिष्ट्य म्हणजे या परिसरातील शाळकरी विद्यार्थी येथे एकांतात अभ्यास करण्यासाठी येतात तर वांबोरी परिसरातील पंचक्रोशीतील व आसपासची गावातील मंडळी या ठिकाणी येऊन दशक्रिया विधीचा कार्यक्रम करतात हे बघून मन शांती मिळते काही लोकांकडून तर या स्मशानभूमीत गृहशांती व लहान मुलांच्या शांतीची धार्मिक विधी देखील केली जात असल्याने या स्मशानभूमीला महत्त्वाचे स्थान निर्माण झाले असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!