वैजापूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- रामगिरी महाराज सरला बेट यांच्या प्रेरणेने व सदगुरु नारायणगिरीजी महाराज आश्रम चिंचडगाव ता.वैजापूर मठाधिपती महंत राजेश्वरगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने अधिक मासानिमित्त श्रीक्षेत्र पैठण या ठिकाणी दि.१८ जुलै २२ जुलै २०२३पांच दिवसीय अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काकड आरती विष्णुसहस्रनाम ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ व ०७ ते नऊ किर्तनसेवा पार पडली.नंतर रोज महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले होते.
पंचदिवसीय हरिनाम सप्ताह मध्ये ज्ञानेश्वरी व्यासपीठाची जबाबदारी हभप अशोक म.राऊत, हभप संदीप महाराज सांगळे,हभप रामेश्वर महाराज वेरुळकर यांनी पार पाडली. या कार्यक्रमाची सांगता वैराग्यमूर्ती महंत गुरुवर्य राजेश्वरगिरीजी महाराज चिंचडगाव आश्रम यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. याप्रसंगी महाराज म्हणाले परब्रम्ह परमात्मा सुद्धा निष्काम सेवा करणारे एकनाथ महाराजांसारख्या भक्ताच्या घरी येऊन सेवा करतो.
काल्याची पंगत वैजापूर तालुक्यातील भग्गाव येथील सूर्यभान जगताप यांनी दिली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे, आसाराम बारहाते, कल्याण तांबे, सुनील कारभार , अनिल काळे , विष्णू पैठणकर ,सूरज महाराज,देविदास मिसाळ, प्रवीण गोसावी, नवनाथ साठे, संतोष दोडे, दत्तू काळे, सुनील तांबे ,संदीप वाडेकर, रामभाऊ रहाटवळ, नवनाथ काळे आदीसह भाविकांची उपस्थिती होती.



