लोणी दि.२५( जनता आवाज वृत्तसेवा ):-कोरोना नंतर होणारा प्रवरा सांस्कृतिक आणि क्रिडा महोत्सव हा विद्यार्थ्यासाठी दिशादर्शक करत असून अभ्यास बरोबरचं खेळास महत्व दिल्यास आरोग्य उत्तम राहण्यास मद्दत होते. खेळातून मुलांना आत्मविश्वास मिळतो सांघिक भावना वाढीस लागते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या प्रवरा सांस्कृतिक आणि क्रिडा महोत्सव २०२३ निमित्त प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी येथे आयोजित शाळा आणि महाविद्यालयाच्या खो-खो स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी सौ. विखे पाटील बोलत होत्या.
यावेळी संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य सरुनाथ उंबरकर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक राहुल धावणे, सिनेट सदस्य अनिल विखे ,प्रा. सोपानराव विखे, माजी उपसरपंच आनिल विखे, रामभाऊ विखे, दिलीप विखे, किशोर धावणे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, संस्थेचे संचालक डॉ. प्रदिप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने, तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.व्ही आर. राठी, आय. टी. आय चे प्राचार्य अर्जुन आहेर,तालुका क्रिडा अध्यक्ष प्रा.सुनिल आहेर, क्रिडा संचालक डॉ. प्रमोद विखे, प्रा.विद्या घोरपडे,प्रा. दादासाहेब तुपे, प्रा. भारत पुलाटे, प्रा. सुनिल गागरे, प्रा. बबन सातकर, प्रा. सिताराम वरखड, आदीसह क्रिडा शिक्षक आदी विद्यार्थी उपस्थित होते.
प्रवरा शैक्षणिक संकुलासह विविध शाळा महाविद्यालयातील ४५० मुलींचे ४० संघ सहभागी झाले आहेत. चार मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धा दोन दिवस चालणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये डॉ. प्रमोद विखे यांनी गणेश उत्सवानिमित्त आयोजित क्रिडा स्पर्धेचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. रविंद्र काकडे यांनी तर आभार डॉ. संजय गुल्हाने यांनी मानले.
प्रवरेच्या माध्यमातून लोणी, प्रवरानगर, साञळ, आश्वी खुर्द, कोल्हार, आणि राहाता परिसरात सुरु असलेला प्रवरा सास्कृतिक आणि क्रिडा महोत्सवातून विद्यार्थ्याच्या कला-गुणासह खेळास मिळाल्या प्रोत्साहनामुळे मुलांसह पालकांचा ही मोठा प्रतिसाद आहे.