spot_img
spot_img

प्रवरेच्या अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या खेळाडूंची डोंबिवली, ठाणे येथे होणाऱ्या राज्य एक्वाथलॉन स्पर्धेसाठी निवड

लोणी दि.२५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-डोंबिवली,ठाणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन संघटनेतर्फे आयोजित राज्य एक्वाथलॉन स्पर्धेसाठी लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा अभियांत्रिकीच्या प्रतीक चिंचाने, जतीन लाल, प्रथमेश जाधव आणि पद्यश्री डाॅ.विखे विठ्ठलराव पाटील तंत्रनिकेतनच्या निसर्ग गुगळे यांची निवड झाली आहे हे सर्व खेळाडू ओपन कॅटेगिरी मध्ये खेळणार असून ७५० मीटर पोहणे आणि ५ किलोमीटर धावणे असे अंतर ओपन कॅटेगिरी साठी असणार आहे, प्रवरा अभियांत्रिकीचा प्रतीक चिंचाने व प्रथमेश जाधव हे दोघेही जलतरणाचे अनुभवी खेळाडू असून मागील महिन्यात छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या जलतरण स्पर्धेमध्ये या दोघांनी अनेक पदके प्राप्त केली होती.
   

या सर्व खेळाडूंना प्रवरा अभियांत्रिकीचे क्रीडा संचालक डॉ श्रीनिवास मोतीयेळे तसेच जलतरण प्रशिक्षक अकील शेख यांचे मार्गदर्शन प्राप्त होत आहे.
खेळाडूंच्या या निवडीबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पिटील, ज़िल्हा
परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ , संस्थेचे संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, सहशिक्षण अधिकारी नंदकुमार दळे, प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय गुल्हाने, तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय राठी,महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे सदस्य तसेच ट्रायथलॉन आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी पंच श्री.अभय देशमुख, डॉ प्रमोद विखे पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!