लोणी दि.२५ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या
प्रवरा अभियांत्रिकी महाविद्यालय लोणीमध्ये थर्ड ईअर आणि फायनल ईअर इंजिनिरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी सॉफ्ट स्किल आणि व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत ११०० विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या पूर्व तयारीच्या दृष्टिकोनातून सॉफ्ट स्किल आणि व्यक्तिमत्व विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे अशी माहीती प्राचार्य डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.
हा कोर्स कॉर्पोरेट सॉफ्ट स्किल इन्स्टिट्यूट सीयू-सक्सीड कडून आयोजित केला आहे. प्रशिक्षणासाठी सीयू-सक्सीड चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदरगिरी यांनी राहुल वाघ, संतोष नलावडे,श्रद्धा काथी, भक्ती फडते व तुषार सर्वागोड या एक्स्पर्ट ट्रेनर्समार्फत प्रशिक्षण दिले.
महाविद्यालयाचे नित्य शिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ प्रा. ए. एच. अन्सारी व त्यांच्या टीमने प्रशिक्षणासाठी परिश्रम घेतले. नामांकित बहुराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड होण्यासाठी हा उपक्रम महत्वपुर्ण ठरत आहे.
सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खा. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे पाटील, शिक्षण संचालक प्रा. लीलावती सरोदे, प्रवरा इंजिनीरिंगचे प्राचार्य. डॉ. संजय गुल्हाने यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
ग्रामीण विद्यार्थी हा प्रत्पेक गोष्टीत पुढे असतो. त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते.म्हणून संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम घेतले जातात. यांतून ग्रामीण विद्यार्थी घडून ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळत आहे.



