श्रीगोंदा ( जनता आवाज वृत्तसेवा ):-श्रीगोंदा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात सोमवार दिनांक 25 रोजी कर्मवीरांचा 136 वा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विद्यालयाचे पर्यवेक्षक मा. विलास सुलाखे यांनी शब्दसुमनाने उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर इयत्ता दहावी तील प्रथम तीन क्रमांक, N.M.M.S व R.T.S स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एच के दांगडे साहेबांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सचिन झगडे यांनी आपल्या विशेष शैलीत कर्मवीर अण्णांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ.ज्ञानदेवराव म्हस्के साहेब यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणात सुयोग्य वापर करावा असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली नसती तर समाजातील तळागाळातील लोकांना शिक्षण घेता आले नसते असेही सांगितले.
राज्याचे माजी मंत्री व जनरल बॉडी सदस्य तथा श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार बबनरावजी पाचपुते साहेब यांनी त्यांच्या मनोगतामध्ये माणसाला मोठे व्हायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे म्हणाले .सर्वात शेवटी विद्यालयाचे कलाशिक्षक संतोष भोईटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाप्रसंगी जनरल बॉडी सदस्य कुंडलिकराव दरेकर, बाजीराव कोरडे उपस्थित होते .तसेच नागवडे स. सा. कारखान्याचे संचालक सुभाष काका शिंदे, भाऊसाहेब बरकडे, , स्थानिक स्कूल कमिटी सदस्य नंदिनी काकी वाबळे, विजयराव उंडे, थोर देणगीदार रवींद्रराव महाडिक , युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष स्मितल भैया वाबळे. रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक दिलीप तुपे. रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब मांडे. महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभाताई उंडे, प्रा. फुलसिंग मांडे. साईकृपा कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी संतोष गुंड ,सोसायटीचे चेअरमन प्रमोद शिंदे, ग्राम.प.सदस्य अमोल गाढवे, लक्ष्मण मांडे, देवयानीताई शिंदे, राहुल साळवे, मा. सरपंच नंदकुमार साळवे, रामदास ठाकर सर ,जावेद सय्यद सर, पत्रकार ज्ञानदेव गवते.
यावेळी विद्यालयातील उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक प्रणव नलगे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला .या कार्यक्रमाप्रसंगी स्थानिक स्कूल कमिटी सदस्या सौ. नंदिनी काकी वाबळे व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य विजय उंडे यांनी प्रमुख पाहुणे व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट स्नेहभोजन दिले. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना कोरडे यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सेवकांनी विशेष परिश्रम घेतले .पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.